महिलेला बंदूक दाखवून जीवे मारण्याची धमकी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिलेला बंदूक दाखवून जीवे मारण्याची धमकी

अहमदनगर/प्रतिनिधी : घरगुती वादाच्या कारणातून महिलेला मारहाण करीत बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना बुर्‍हाणनगर (ता. नगर) येथील दे

लक्ष्मीनगरच्या नागरिकांना उतारे मिळण्यासाठी कार्यवाही करा
युवराज गायकवाड जातीय सलोखा जपणारे नेतृत्व : हभप वायसे महाराज
*LokNews24 I दखल अहमदनगरचा विकास का झाला नाही? l पहा LokNews24*

अहमदनगर/प्रतिनिधी : घरगुती वादाच्या कारणातून महिलेला मारहाण करीत बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना बुर्‍हाणनगर (ता. नगर) येथील देवी मंदिराशेजारी घडली. याप्रकरणी आशा सुभाष रोहकले (रा. गुगळे कॉलनी, बुर्हाणनगर) यांनी भिगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, सात जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये अमोल घाडगे, कैलास शेलार, सज्ञान शेलार, ओंकार शेलार, हलका शेलार, बंडू भगत व पेंटा शेलार (पूर्ण नाव माहिती नाही, सर्व रा. बुर्‍हाणनगर ता. नगर) यांचा समावेश आहे. 22 फेब्रुवारीच्या रात्री बुर्‍हाणनगर येथे देवी मंदिराच्या शेजारी आरोपींनी घरगुती वादाच्या कारणातून हत्याराने फिर्यादीला मारहाण केली. गावठी बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस नाईक बी. पी. गायकवाड करीत आहेत.

COMMENTS