Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात पुन्हा एकदा धमकीचे फोन

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आल्याची माहिती समोर आली होती. त्यांच्या नागपूरमधील जनसंपर्क कार्या

एकापाठोपाठ 3 मुलींनी घेतली धावत्या ट्रेनमधून उडी | LOK News 24
बिल्कीस बानो प्रकरणातून न्या. बेला त्रिवेदींची माघार
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक प्रवासातील सातारा

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आल्याची माहिती समोर आली होती. त्यांच्या नागपूरमधील जनसंपर्क कार्यालयात सकाळी धमकीचे तीन फोन आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी कार्यालय आणि त्यांच्या निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था वाढवून फोन करणाऱ्याचा तपास सुरु केला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात पुन्हा एकदा धमकीचे फोन आल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी दोनदा गडकरी यांच्या ऑरेंज सिटी रुग्णालयाच्या समोरील जनसंपर्क कार्यालयात धमकीचे कॉल आले. धक्कादायक म्हणजे पुन्हा एकदा जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा या गुन्हेगाराच्या नावाने धमकीचे कॉल आले आहेत. त्यानंतर नितीन गडकरी यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी नागपूर पोलिसांना पुन्हा एकदा धमकीचे कॉल आल्याची माहिती दिली आहे. नागपूरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात आज सकाळी धमकीचे दोन कॉल आल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. जरी कॉल करणाऱ्या व्यक्तीने तो जयेश कांथा उर्फ जयेश पुजारी बोलत असल्याचा दावा केला असला तरी धमकी देणारी व्यक्ती कोण आणि त्याने कुठून कॉल केले हे अजून स्पष्ट झालेले नाही.

COMMENTS