Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई पोलिसांना धमकीचा फोन

आरडीएक्सने भरलेला टँकर घेवून जात असल्याचा फोन

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला पुन्हा एकदा धमकीचा फोन आला. यावेळी फोन करणार्‍या व्यक्तीने दोन पाकिस्तानी नागरिक आरडीएक्सने भरलेला

कोरोना काळात अंगणवाडी सेविका-मदतनीस यांचे काम प्रशंसनीय : पालकमंत्री
पंतजलीचा दावा आणि भूल
गुटखा विक्री करणाऱ्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या, एक लाखाचा माल जप्त|

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला पुन्हा एकदा धमकीचा फोन आला. यावेळी फोन करणार्‍या व्यक्तीने दोन पाकिस्तानी नागरिक आरडीएक्सने भरलेला टँकर मुंबईहून गोव्याला घेऊन जात असल्याची माहिती दिली. फोन करणार्‍याने स्वत:ची ओळख पांडे अशी सांगितले आहे.
या फोननंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून पुढील तपासाला सुरुवात झाली आहे. मुंबई पोलिसांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. गेल्या दहा दिवसांतील ही तिसरी धमकी आहे. तीन दिवसांपूर्वी वाहतूक नियंत्रण कक्षालाही धमकी देण्यात आली होती. त्यावेळी मुंबईत 26/11 सारखा दहशतवादी हल्ला घडवून आणला जाईल, अशी धमकी देण्यात आली. एवढेच नव्हेतर योगी आदित्यनाथ यांचे सरकार निशाण्यावर असल्याची माहिती मसेजद्वारे देण्यात आली. याचबरोबर काही ठिकाणी काडतुसे आणि एके 47 पोहोचल्याचेही सांगण्यात आले होते.

COMMENTS