Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोतुळच्या ग्रामविकास अधिकार्‍याला धमकी

अकोले ः कोतुळचे ग्रामविकास अधिकारी मार्तंड वावीकर यांना शरद गौण खनिजा ना हरकत व काही दाखल्यावरून अरेरावी शिवीगाळ करून, कट मारून उडवून देण्याची धम

घराला लागलेल्या आगीत संसार उपयोगी वस्तू जळून खाक
मनोधैर्य योजनेने दिला महिलांना आधार ; जिल्ह्यातील 109 पीडितांना पावणे दोन कोटी रुपयांचे अर्थसाह्य
श्रीगोंद्यातील कोथूळ शिवारात तरुणाची हत्या

अकोले ः कोतुळचे ग्रामविकास अधिकारी मार्तंड वावीकर यांना शरद गौण खनिजा ना हरकत व काही दाखल्यावरून अरेरावी शिवीगाळ करून, कट मारून उडवून देण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सीताराम काशिनाथ देशमुख, तसेच शंकर रामदास घोलप, धनंजय रमेश देशमुख, बाळासाहेब जयराम देशमुख (रा. कोतूळ) यांच्या विरोधात अकोले पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत दाखल फिर्यादीत म्हटले आहे, की सोमवारी कोतुळ ग्रामपंचायतीमध्ये काम करत असताना दुपारी चार वाजल्याच्या सुमारास कोतूळ गावातील शंकर रामदास घोलप, धनंजय रमेश देशमुख हे  गौणखनिजाबाबतचा ना हरकत दाखला घेण्याकरिता माझ्याकडे आले व आम्हाला लगेच ना हरकत दाखला द्या, असे बोलले. म्हणून मी त्यांना सांगितले की, माझी उद्या मिटिंग आहे. तुम्ही दोन दिवसांनी जागेचे उतारे घेऊन या व ना हरकत दाखला घेऊन जा.. त्यांनी माझ्याशी अरेरावीची भाषा करून, तू आमच्यासाठी नोकर आहेस. तू ऑफिसला येऊ नको, असे म्हणून मला शिवीगाळ करून, तू येथे कसा राहतो हेच पाहतो, असा दम दिला. त्यांनी फोन करून लगेच बाळासाहेब जयराम देशमुख, सीताराम काशिनाथ देशमुख यांना बोलावून घेतले व त्यांनी मला कॅबिनमध्ये बोलावले. तुम्ही दाखला का देत नाही असे म्हणून त्यांनीही शिवीगाळ करून मला कट मारून उडवून देऊ अशी धमकी दिली. या वेळी माझे कार्यालयाचे आपरेटर देशमुख व शिपाई गोडे, पाणीपुरवठा कर्मचारी आरोटे हे हजर होते. त्यांनी संबंधित लोकांची समजूत काढली; परंतु ते ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हते. म्हणून शंकर रामदास घोलप, धनंजय रमेश देशमुख, बाळासाहेब जयराम देशमुख, सीताराम काशिनाथ देशमुख यांच्याविरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून भा.द.वि. कलम 186, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान या प्रकरणावरून राजकीय रंग  भरू लागला आहे गुन्हा दाखल करण्या मागे राजकीय  शक्तींचा हात असल्याची चर्चा सुरू असून या घटनेवरून आज कोतुळ येथे  सायंकाळी एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत  ग्रामविकास अधिकारी यांनी दबावातून पदाधिकार्‍यांवर चुकीचा व खोटा गुन्हा पोलिसांत दाखल केल्याने या घटनेचा निषेध नोंदविला.

COMMENTS