Homeताज्या बातम्यादेश

पंतप्रधान मोदींसह शहांना जीवे मारण्याची धमकी

नवी दिल्ली/प्रतिनिधी : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित

मोठी घडामोड… मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गृहमंत्री अमित शहांच्या भेटीला… युतीबाबत…?
लडाखमध्ये पाच नव्या जिल्ह्यांची घोषणा  
राज्यांसाठी आपत्ती निवारण निर्माण प्रकल्पांना मंजुरी

नवी दिल्ली/प्रतिनिधी : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यामुळे खळबळ उडाली आहे. दिल्ली पोलिसांना फोनवरुन ही धमकी देण्यात आली आहे. यानंतर तात्काळ पोलिसांनी सुत्रे हालवत धमकी देणार्‍याचा शोध घेण्यासाठी एक टीम तैनात करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिल्लीच्या बाह्य जिल्हा पोलिसांना पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना जीवे मारण्याची धमकी देणारे 2 कॉल आले. ज्यानंतर एकच खळबळ उडाली. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून धमकीचा कॉल करणार्‍या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी एक टीम तैनात करण्यात आली आहे. या धमकीनंतर दिल्ली पोलिसांनी धमकी देणार्‍या व्यक्तीला दारूचे व्यसन असून त्याला लवकरच पकडले जाईल, असे सांगितले आहे. तसेच आम्ही त्यांच्या कुटुंबाकडे पोहोचलो, जिथे कळले की त्याला दारुचे व्यसन असून रात्रीपासून दारू पित आहे. तसेच तो आता घरी नसून त्याला लवकरच अटक करु असेही पोलिसांनी सांगितले आहे.

COMMENTS