Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इंडिगो विमानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

मुंबई ः मुंबई विमानतळावर उतरलेल्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली. चेन्नईहून मुंबईला आ

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एकोप्याने काम करा : उपमुख्यमंत्री अजित पवार
वारकर्‍यांना मूलभूत सोयी-सुविधा देण्यासाठी नियोजन करा
आरोप- प्रत्यारोपाचे राजकारण

मुंबई ः मुंबई विमानतळावर उतरलेल्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली. चेन्नईहून मुंबईला आलेले विमान (6 ई- 5188) मुंबई विमानतळावर उभे असताना ही धमकी देण्यात आली. ए 321 निओ एअरक्राफ्टचे पायलट मुंबई विमानतळापासून 40 किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर असताना हवाई वाहतूक नियंत्रणाला या धोक्याची माहिती प्राप्त झाली. या प्रकरणी अधिक चौकशी केली जात आहे.
इंडिगोने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चेन्नईहून मुंबईला आलेल्या इंडिगो फ्लाइट 6 ई 5188 मध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली. सर्व आवश्यक प्रोटोकॉलचे पालन करण्यात आले आणि विमानतळ सुरक्षा एजन्सींच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार विमानतळापासून दूर नेण्यात आले. सर्व सुरक्षा तपासण्या पूर्ण झाल्यानंतर विमान टर्मिनल परिसरात परत आणले जाईल. चेन्नईहून आलेल्या इंडिगो विमानात बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळताच मुंबई विमानतळावर खळबळ माजली. विमानाची तपासणी केली जात आहे.

COMMENTS