सोलापूर प्रतिनिधी - केंद्र सरकारने ‘पीएफआय’ संघटनेवर नुकतीच बंदी घातली. याच गोष्टीचा राग मनात धरून एका अनोळखी व्यक्तीने भाजप आमदार विजयकुमार देशमुख
सोलापूर प्रतिनिधी – केंद्र सरकारने ‘पीएफआय’ संघटनेवर नुकतीच बंदी घातली. याच गोष्टीचा राग मनात धरून एका अनोळखी व्यक्तीने भाजप आमदार विजयकुमार देशमुख(Vijay Kumar Deshmukh) यांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र पाठविले आहे. टपालातून त्यांना ४ ऑक्टोबरला घरपोच पत्र मिळाले असून त्यांनी पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांची तातडीने भेट घेतली. त्यानंतर पत्रातील ‘त्या’ व्यक्तीचा शोध गुन्हे शाखा व ‘एटीसी’ने सुरु केला आहे.या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा एकेरी उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, पत्राचे गांभीर्य ओळखून पोलिस आयुक्त डॉ. माने यांनी संबंधित यंत्रणेला सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

COMMENTS