Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कापूसखेड मध्ये त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त हजारो दिव्यांचा झगमगाट

इस्लामपूर /प्रतिनिधी : कापूसखेड (ता. वाळवा) येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला. येथील जोतिर्लिंग मंदिर, सिध्दनाथ जोगेश्

माजी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त कराडमध्ये आयोजित कुस्ती स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद
गोंदवले येथील फर्निचरच्या शोरुमला भीषण आग; लाखोचे नुकसान; चारजण जखमी
उच्च शिक्षणासाठी शिवराज विश्‍वनाथ डांगे इंग्लंडला रवाना

इस्लामपूर /प्रतिनिधी : कापूसखेड (ता. वाळवा) येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला. येथील जोतिर्लिंग मंदिर, सिध्दनाथ जोगेश्‍वरी मंदीर, हनुमान मंदिर, भजनी मंडप तसेच दगडी दीपमाळा या ठिकाणी हजारो दिवे लावण्यात आले होते.
त्यासाठी जवळपास 50 लीटर तेल लागले. दुपारी तीनपासून याची तयारी सुरु होती. पणत्या ठेवण्याच्या जागेवर रांगोळी काढण्यात आली. सहा इंचाच्या अंतरावर पणत्या ठेवल्या होत्या. सायंकाळी सातच्या दरम्यान जोतिबाच्या देवालयात पुजारी प्रशांत गुरव, महादेव गुरव, संदिप गुरव यांच्या हस्ते विधिवत पुजा करून पणत्यांच्या ज्योती प्रज्ज्वलित केल्या गेल्या. अवघ्या दहा मिनिटात हजारो पणत्या उजळून हा परिसर तेजोमय होवून गेला. दीपोत्सव पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. माणिक माळी यांच्यासह युवक, ग्रामस्थांनी याचे संयोजन केले.

COMMENTS