ज्यांना आहे दम्याचा त्रास त्यांनी हे पथ्य पाळावेत

Homeताज्या बातम्यालाईफस्टाईल

ज्यांना आहे दम्याचा त्रास त्यांनी हे पथ्य पाळावेत

lokmanthan Health Tips : पावसाळा म्हणजे अनेकांसाठी निसर्ग सौन्दर्य अनुभवण्यासाठी पर्वणीच असते. मात्र विशेषतः दम्याच्या रुग्णांसाठी, पावसाळा हा ऋत

एएनएम आणि जीएनएम अभ्यासक्रमांसाठी सीईटी नाही : वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख
विद्यार्थ्यांच्या संकल्पनांना व्यासपीठ मिळावे यासाठी प्रयत्न करावा
रोज मासे खात असल्यामुळेच ऐश्‍वर्याचे डोळे सुंदर

lokmanthan Health Tips : पावसाळा म्हणजे अनेकांसाठी निसर्ग सौन्दर्य अनुभवण्यासाठी पर्वणीच असते. मात्र विशेषतः दम्याच्या रुग्णांसाठी, पावसाळा हा ऋतू केवळ आव्हानात्मकच नाही, तर कधी कधी प्राणघातकही ठरतो.

या ऋतूमध्ये हवेमध्ये आर्द्रतेचं प्रमाण प्रचंड वाढतं, श्वास घेताना त्रास होणे, छातीत दडपण जाणवणे, सतत खोकला, आणि घसादुखी ही लक्षणं अधिक तीव्र होऊ लागतात. पावसाच्या आगमनाने जितका आनंद निर्माण होतो, तितकीच चिंता या रुग्णांच्या घरात डोकावते.

जेव्हा वातावरणात जोरदार वादळ आणि पाऊस असतो, तेव्हा रुग्णालयात दाखल होणाऱ्या दम्याच्या रुग्णांची संख्या 1.25 पट वाढते. विशेष म्हणजे या काळात मृत्यूचा धोका 2.10 पट वाढतो, आणि ही आकडेवारी नुसती भीतीदायक नाही, तर जागरूक करणारी आहे.

काय काळजी घ्याल?
या परिस्थितीत स्वतःची योग्य काळजी घेणं हेच सर्वात प्रभावी संरक्षण आहे. घरात ओलसरपणा होणार नाही, याची सतत काळजी घेतली पाहिजे. शक्यतो घर कोरडं, स्वच्छ आणि हवेशीर ठेवा. भिंतींवर बुरशी किंवा काळपट डाग दिसू लागले, तर तत्काळ त्यावर उपाय करा. घरातील फर्निचर आणि पडद्यांमध्ये ओलावा साचू देऊ नका.

तसेच, बाहेर जाताना डॉक्टरांनी सांगितलेला इनहेलर किंवा औषधे नेहमी जवळ असावीत. सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क वापरणं अशा अ‍ॅलर्जीक परिस्थितीत फायदेशीर आहे. शक्य असल्यास, अनावश्यक प्रवास किंवा भिजणं टाळा. आणि हो, आहारही याच काळात महत्त्वाचा असतो. तळलेलं, थंड किंवा मागच्या दिवशीचं अन्न टाळा. यामुळे संसर्गाचा धोका वाढतो.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांचा सल्ला वेळोवेळी घेत राहणं. आपल्याला वाटतं तसं हे केवळ ऋतूमानाशी जोडलेलं तात्पुरतं त्रासदायक प्रकरण नाही, तर योग्य खबरदारी न घेतल्यास आयुष्यावर परिणाम करणारा गंभीर आजार ठरू शकतो.

COMMENTS