लस न घेतलेल्यांना पेट्रोल व रेशन नाही : पालक मंत्री मुश्रीफ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लस न घेतलेल्यांना पेट्रोल व रेशन नाही : पालक मंत्री मुश्रीफ

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर जिल्ह्यामध्ये नऊ लाखजणांनी अद्यापपर्यंत कोणताच कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेतलेला नाही. त्यामुळे त्यांचा शोध घेऊन गावा-गावांत

आयुष्याचा अंतिम हेतू समाधान हाच आहे – डॉ. संजय कळमकर
’उसगावचा संतमहिमा’ लिहिणारे सुखदेव सुकळे संतवृत्तीचेच ः प्राचार्य डॉ. टेमकर
बिनविरोधला ठेंगा…शिक्षक बँकेत चौरंगी लढत

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर जिल्ह्यामध्ये नऊ लाखजणांनी अद्यापपर्यंत कोणताच कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेतलेला नाही. त्यामुळे त्यांचा शोध घेऊन गावा-गावांतून त्यांच्या नावांचे फलक लावा तसेच त्यांच्या पेट्रोल, रेशन व अन्य सुविधा तात्काळ रद्द करा, असे आदेश ग्रामविकास मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी प्रशासनाला दिले. करोना अजून पूर्णपणे संपलेला नाही, जानेवारीच्या शेवटी तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे, त्याची खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आली आहे व 100 टक्के लसीकरण गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील कर्जत, पारनेर व अकोले या नगर पंचायतींच्या निवडणूक प्रचारानिमित्त सुमारे दीड-दोन महिन्यांनी जिल्ह्यात आलेले पालकमंत्री मुश्रीफ यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे आदींसह पदाधिकारी व अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मुश्रीफ म्हणाले की, नगर जिल्ह्यामध्ये अद्यापपर्यंत नऊ लाख लोकांनी एकही डोस घेतला नाही तर पाच लाख लोकांनी पहिला डोस घेतला, पण अजून दुसरा डोस घेतला नाही. ज्यांनी अजूनपर्यंत एकही डोस घेतलेला नाही, त्यांच्या संदर्भातल्या ज्या काही नागरी सुविधा आहे, यामध्ये पेट्रोल असो अथवा रेशन व अन्य सुविधा तात्काळ बंद कराव्यात, अशा प्रकारचे निर्देश येथील प्रशासनाला दिले असून त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर केली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ज्या कुणी एकही डोस घेतलेला नाही, अशा व्यक्तींची नावे त्यांच्या गावांमध्येही जाहीर करावीत, अशा प्रकारच्या सूचनासुद्धा देण्यात आलेल्या आहेत. गावा-गावातून त्यांचा शोध घेऊन त्यांच्याशी डोस घेण्याबाबत संवाद साधावा तसेच त्यांच्या नावांचे फलक गावातून लावण्याचेही आदेश दिल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. दरम्यान, लहान मुलांच्याबाबतीमध्ये करोना प्रमाण वाढले तर याबाबत राज्य सरकार निश्‍चितपणे उपाययोजना धोरण घेईल, पण पालकांनीही यादृष्टीने मुलांची काळजी घेतली पाहिजे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

जगभरात ओमायक्रॉन हा नवीन विषाणू फैलावत चाललेला आहे. महाराष्ट्रामध्ये काही रुग्ण सापडले आहेत. नगर जिल्ह्यामध्ये मात्र तसा रुग्ण अद्यापपर्यंत आढळून आलेला नाही, असे सांगून ते म्हणाले, कोराना अद्यापपर्यंत संपलेला नाही. अनेक तज्ञांच्या मते तिसरी लाट जानेवारीमध्ये शेवटी वा फेब्रुवारीच्या सुरुवातीला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने दुर्लक्ष न करता गांभीर्याने या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे व तशा प्रकारच्या सूचना दिल्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नगर जिल्ह्यामध्ये लहान मुलांना करोनाची लागण झालेली आहे यावर विचारले असता याबाबतची निश्‍चितपणे काळजी आम्ही घेत आहोत व पालकांनीसुद्धा लहान मुलांची काळजी घ्यावी असे आवाहन आम्ही करीत आहोत. जर रुग्णसंख्या वाढली तर राज्य सरकार यासंदर्भात निश्‍चित धोरण घेईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

हा तर योगायोग
केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा हे आज शनिवारी नगर जिल्ह्याच्या दौर्‍यावर आलेले आहेत, पण त्यांच्या दौर्‍याला आडकाठी होईल असे कोणतेही नियोजन आमचे नव्हते. आज नगर जिल्ह्यातील नगर पंचायतीच्या तीन ठिकाणच्या प्रचाराच्या संदर्भात मी जिल्ह्यामध्ये आलेलो होतो व कोरोना संदर्भातील आढावा बैठकसुद्धा त्यानिमित्ताने आयोजित केलेली होती, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सरकारी यंत्रणेेला आडवायचा यामागचा उद्देश नव्हता, सहकार परिषद व माझा दौरा हा योगायोग होता, अशी टिप्पणीही मुश्रीफ यांनी यावेळी केली.

पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध
नगर जिल्ह्यामध्ये जिल्हा नियोजनातून आम्ही 14 ऑक्सिजन प्लान्ट उभारण्याकरता मंजूर केलेले आहे. यापैकी 11 ऑक्सिजनचे प्लान्ट उभारण्यात आलेले आहेत. तीन प्लान्टची काही कामे अद्याप बाकी आहे. या महिन्यांमध्ये ती कामे पूर्ण केली जातील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्याची गरज व तीन दिवसांचा साठा या नियोजनानुसार 228 मेट्रिक टन ऑक्सिजन जिल्ह्यात उपलब्ध आहे, असेही त्यांनी सांगितले.

COMMENTS