Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकर्‍यांचे पशुधन चोरणारे 4 तासात जेरबंद

कोपरगाव ग्रामीण पोलिसांची कामगिरी

कोपरगाव प्रतिनीधी ः कोपरगाव तालुका पोलिस ठाणे हददीतील रवंदे गावचे शिवारातुन सोमवारी रात्री 10 ते सकाळी 2ः30 च्या वाजेदरम्यान शेतकरी शालिनी संजय क

 मुंबईतील चित्रपट नगरी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री पळवून नेतील-  आमदार रोहित पवार 
दौड यांच्या भूमिकेनंतर पाथर्डी तालुक्याचे राजकारण तापले
कोपरगाव नगरपरिषदेने काढली स्वच्छता जागृती फेरी

कोपरगाव प्रतिनीधी ः कोपरगाव तालुका पोलिस ठाणे हददीतील रवंदे गावचे शिवारातुन सोमवारी रात्री 10 ते सकाळी 2ः30 च्या वाजेदरम्यान शेतकरी शालिनी संजय कदम यांच्या मालकीची तांबडया रंगाची 10 हजार रुपये किंमतीची शेळी कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेली होती. त्याबाबत कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गु.र.नं. 132/2023 भा.द.वि.क. 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येऊन सदर गुन्हयाचा कोपरगाव तालुका पोलीसांनी पोलीस पथकामार्फत तपास करत सदर गुन्ह्यातील आरोपींना मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या असल्याची माहिती ग्रामीण पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी दिली आहे.
देसले यांनी अधिक माहिती देतांना सांगितले की, सदर गुन्हयाचा तपास सुरु असतांना मला गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, तीन अनोळखी इसम हे एका डिस्कव्हर मोटार सायकल उभी करुन तिला तांबडया रंगाची शेळी बांधलेली आहे व त्यांचे मोटार सायकलमधील पेट्रोल संपल्याने ते रोडवर उभे आहेत वगैरे मजकुरची बातमी मिळाल्याने सदर बातमीची खात्री करण्यासाठी सफौ सुरेश गागरे, पोकॉ युवराज खुळे व पोकॉ जयदिप गवारे चालक पोकॉ चंद्रकांत मेढे यांना सरकारी वाहनांसह रवाना केले. पोलीस पथक हे टोलनाक्याकडुन नाटेगावकडे जात असताना त्यांना नमुद बातमीतील हकीगतीप्रमाणे तीन इसम हे मोटार सायकल व शेळी सह मिळुन आले त्यांना ताब्यात घेवून नाव गाव पत्ते विचारले असता, त्यांनी त्यांची नावे लक्ष्मण लहु पवार वय 24 वर्षे, सागर राजेंद्र मोरे वय 18 वर्षे व भिमा रामदास मोरे वय 18 वर्षे सर्व रा. निमगाव मढ,ता येवला अशी सांगितली त्यांचेकडे मिळुन आलेल्या तांबडया रंगाचे शेळीबाबत विश्‍वासात घेवुन विचारपुस करता, त्यांनी सदरची शेळी रवंदा गावच्या शिवारातुन रात्रीच चोरुन आणल्याची कबुली दिली. सदर आरोपींकडुन पोलीसांनी 45 हजार रुपये किंमतीची  मोटार सायकल व चोरीस गेलेली 10 हजार रुपये किंमतीची  शेळी  असा एकुण 55 हजार रुपयेचा मुददेमाल हस्तगत केला आहे. सदरची कौतुकास्पद कामगीरी पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांचे मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले, स.फौ. सुरेश गागरे, पोहेकॉ संदिप बोटे, पोकॉ युवराज खुळे,पोकॉ जयदिप गवारे व चालक पोकॉ चंद्रकांत मेढे यांनी केली आहे.

COMMENTS