पुणे ः मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर आर्थिक निकषावर देण्याची मागणी केली होती. त्यावर मनोज जरांगे यांनी प्रत्यु
पुणे ः मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर आर्थिक निकषावर देण्याची मागणी केली होती. त्यावर मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर दिले. राज ठाकरेंना आरक्षणाची गरज नाही. पण बाकीच्यांना आरक्षण हवे आहे. एसीत बसणार्यांना आरक्षणाची झळ कळणार नाही, असे जरांगे म्हणाले.
राज ठाकरेंना आरक्षणाची गरज नाही. पण बाकीच्यांना हवे आहे. गोरगरिबांना आरक्षणाची आवश्यकता आहे, याचा राज ठाकरे यांनी विचार करायला पाहिजे. त्यांना जे वैभव मिळाले आहे, ते मराठ्यांच्या जीवावर मिळाले. एसीत बसणार्यांना आरक्षणाची झळ कळणार नसल्याचा टोला जरांगे यांनी लगावला आहे. राज ठाकरे यांच्या ताफ्यावर झालेल्या सुपारी हल्लाबाबत बोलताना जरांगे म्हणाले की, ’राज ठाकरेंच्या गाडीवर सुपारी फेकणारे मी बघितले नाही. पण राज्यात आंदोलन सुरू नाहीत. फडणवीसांनी सुपारी घेतलासारखे आंदोलन करणे, रॅली काढणे बंद करा. मराठा समाजात ताकद असल्याचे देखील जरांगे म्हणाले.
COMMENTS