Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

यंदा पाऊस चांगला झाल्याने तुर पिकं डोलु लागल्याने शेतकरी समाधानी 

जळगाव प्रतिनिधी - यावर्षी पावसाच्या प्रमाण सुरुवातीला कमी असल्याने शेतकरी काही अडचणीत सापडल्याप्रमाणे होते परंतु त्यानंतर पाऊस चांगल्या प्रका

सरकारी नोकर्‍यांमध्ये कंत्राटी पध्दतीने नोकर भरतीचा दुर्भाग्यपूर्ण निर्णय : आ. पृथ्वीराज चव्हाण
कृषिकन्याचे पानसवाडीत शेती मार्गदर्शन
फलटण तालुका सहकारी दुध संघाची निवडणूक बिनविरोध

जळगाव प्रतिनिधी – यावर्षी पावसाच्या प्रमाण सुरुवातीला कमी असल्याने शेतकरी काही अडचणीत सापडल्याप्रमाणे होते परंतु त्यानंतर पाऊस चांगल्या प्रकारे झाल्याने चोपडा तालुक्यासह जिल्हाभरामध्ये तुरीचे क्षेत्रात वाढ झालेली काही शेतकऱ्यांनी कोरडवाहु पेरणी केली तर काहींनी पाण्याची व्यवस्था असल्याने तुरीला ठिबकच्या साह्याने पाणी दिले आता काही दिवसांवर तूर काढणीला येईल शेतामध्ये तुरीचे पीक ढोलु लागले आहेत  तुरीला खर्च कमी असल्याने आणि उत्पन्नही चांगल्या प्रकारे येत असतं व शासनाकडून हमीभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना तुरी पासून चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळत असतं चोपडा तालुक्यातील शेतकऱ्याने कोरडवाहू तुरीची चार एकर मध्ये पेरणी केलेली आहे येत्या दहा-पंधरा दिवसात तूर काढणीला येणार आहे या चार एकर मध्ये उत्पन्न चांगले येण्याचे त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे यावर्षी चार एकर तुरीची लागवड केलेली आहे पुढील वर्षी मी  स्वतःची 15 एकर तूर लागवड करणार असल्याचे यावेळी तुर उत्पादक शेतकरी यांनी सांगितले शेतकऱ्यांनी कमी खर्चाचे कमी श्रमाची आणि चांगलं उत्पन्न देणारी तुरीचे पीक आहे तरी शेतकऱ्यांनी तूर लागवड जास्त वडायला काय हरकत नाही  असे सांगितले. 

COMMENTS