मुंबई ः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यास यंदा 6 जून रोजी 350 वर्ष पूर्ण होत आहे. मात्र यंदा हा शिवराज्याभिषेक सोहळा आचारसंहि
मुंबई ः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यास यंदा 6 जून रोजी 350 वर्ष पूर्ण होत आहे. मात्र यंदा हा शिवराज्याभिषेक सोहळा आचारसंहितेच्या बडग्यात अडकल्यामुळे यंदा धूमधडाक्यात हा उत्सव साजरा करता येणार नाही. मात्र यातून राज्य सरकारने मार्ग काढावा अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. शिवराज्याभिषेकास 350 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी सोहळा साजरा केला जाणार आहे. एकूणच या कार्यक्रमांच्या नियोजनासाठी शिवभक्तांच्या सूचना मागविण्यात येत आहेत. लोकसभा निवडणूक आचारसंहिता 10 जूनपर्यंत असल्याने थोडी अडचण आहे. पण सोहळा दिमाखदार होण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोललो असून शिवराज्याभिषेक सोहळा राष्ट्रीय उत्सव सारखा साजरा करावा यासाठी सरकारने लक्ष घालावे अशी मागणी केल्याचे संभाजीराजे छत्रपतींनी यांनी स्पष्ट केले. येत्या 6 जूनला 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची तयारी पुण्यातून सुरु झाली आहे. त्यावेळी राजेंनी माध्यमांशी संवाद साधला. किल्ले रायगड येथे अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे 6 जूनला साजरा होणार्या 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीसाठी पूर्व नियोजन राज्यव्यापी बैठक पुणे येथे नुकतीच झाली.
या बैठकीस युवराज संभाजीराजे छत्रपती, युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती, युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती होती. युवराज संभाजीराजे छत्रपती म्हणाले शिवराज्याभिषेकास 350 वर्षे पूर्ण होत आहेत. वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी सोहळा साजरा केला जाणार आहे. एकूणच या कार्यक्रमांच्या नियोजनासाठी शिवभक्तांच्या सूचना मागविण्यात येत आहेत. 350 वा शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या वर्ष पूर्ततेचे हे वर्ष आहे. तेवढ्याच जोमाने उत्सव होण्यासाठी राज्यव्यापी बैठक घेतली. रायगड जिल्ह्यात निवडणूक आचारसंहिता 10 जूनला असल्याने थोडी अडचण पण सोहळा दिमाखदार होण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यास गेल्या वर्षी निधी आला होता. यंदा देखील तीच अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
COMMENTS