पुणे : पावसाने ऑगस्ट महिन्यात दिलेली उघडीप, मोसमी आणि बिगरमोसमी पाऊस न झाल्यामुळे राज्यातील कापूस उत्पादनात 30 टक्क्यांहून अधिक घट येण्याचा अंदाज
पुणे : पावसाने ऑगस्ट महिन्यात दिलेली उघडीप, मोसमी आणि बिगरमोसमी पाऊस न झाल्यामुळे राज्यातील कापूस उत्पादनात 30 टक्क्यांहून अधिक घट येण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यात उत्पादनात मोठी तूट येण्याची शक्यता आहे. विदर्भात मात्र समाधानकारक उत्पादनाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मांडाखळी (ता. जि. परभणी) येथील रमेश राऊत कापूस उत्पादनाविषयी म्हणाले, की मराठवाड्यात सिंचनाची सोय असलेल्या जमिनीत सरासरी 60 आणि कोरडवाहू जमिनीत जेमतेम 30 टक्क्यांपर्यंत कापूस उत्पादन होईल. ऑगस्टमधील पावसाच्या ओढीमुळे कापूस पिकाची चांगली वाढ झाली नाही. माघारी मोसमी पाऊस अथवा बिगरमोसमी पाऊस न झाल्यामुळे कापसाची बोंडे लहान राहिली आहेत. आता पाण्याअभावी पाने गळून पडू लागली आहेत. अनेक ठिकाणी कापसाचे पीक करपून गेले आहे. यंदा लाल बोंडअळीचा प्रादुर्भाव नाही. पण, पाऊस नसल्यामुळे करपा आणि अळीचा प्रादुर्भाव आहे. पाण्याअभावी सिंचनाची सोय असलेल्या जमिनीत उत्पादनात 30 टक्क्यांपर्यंत, तर कोरडवाहू जमिनीत उत्पादनात 60 टक्क्यांपर्यंत घट येण्याचा अंदाज आहे.
COMMENTS