Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

यंदा पाऊस 106 टक्के पाऊस कोसळणार

हवामान विभागाने वर्तवला पहिला अंदाज मुंबई : गेल्यावर्षी झालेला अपुरा पाऊस त्यामुळे अनेक तालुक्यांमध्ये निर्माण झालेली दुष्काळी परिस्थितीमुळे ऐ

डाळींचे भाव कडाडले ; तूरडाळ 15 रूपयांनी महाग
राजारामबापू साखर कारखान्यामार्फत सभासद शेतकर्‍यांना फळझाडांचे वाटप
कृषि विद्यापीठाच्या क्षारपड जमीन क्षारमुक्त

हवामान विभागाने वर्तवला पहिला अंदाज

मुंबई : गेल्यावर्षी झालेला अपुरा पाऊस त्यामुळे अनेक तालुक्यांमध्ये निर्माण झालेली दुष्काळी परिस्थितीमुळे ऐन उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे. मात्र यंदा देशभरात चांगला पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यंदा सरासरीहून अधिक पाऊस पडण्याची शक्यता असून, देशात सरासरीच्या 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सोमवारी ही माहिती दिली.
यंदा मान्सून सामान्यपेक्षा अधिक चांगला राहणार असन, महाराष्ट्रात देखील यंदा मान्सून चांगला राहणार आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात चांगला पाऊस होईल, असे भाकीत हवामान विभागाने वर्तवले आहे. यासंदर्भात अधिक माहिती देतांना महापात्रा म्हणाले, यंदा सामान्यहून अधिक पाऊसाचा अंदाज आहे. 5 जून ते 30 सप्टेंबर दरम्यान 106 टक्के पाऊसाचा अंदाज असून, यंदा सामान्यपेक्षा चांगली परिस्थिती आहे. 8 जून पर्यंत मान्सून येण्याची स्थिती आहे. अल निनोची परिस्थिती सध्या मध्म असून, पावसाळा सुरू झाल्यावर अल निनोचा प्रभाव संपला असेल. अल निनोचा प्रभाव कमी होतो आहे. दरवर्षी शेतकर्‍यांना भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाची प्रतिक्षा असते. सगळे शेतकरी नेमका हवामान विभागाचा काय अंदाज येईल याची वाट बघत असतात. अखेर हवामान विभागाचा अंदाज आज जाहीर झाला आहे. दरम्यान हा भारतीय हवामान विभागाचा पहिला दीर्घकालीन अंदाज आहे. पुढचा सुधारीत पावसाचा अंदाज हा मे महिन्याच्या शेवटी वर्तवण्यात येणार आहे. त्यानंतर मान्सूनसंदर्भातील चित्र आणखी स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्रात देखील यंदा मान्सून चांगला राहणार आहे. सामान्यपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान राज्यात चांगला पाऊस होतो, भारतीय हवामान विभागाने ही माहिती दिली आहे.

सर्वाधिक पावसाचा अंदाज
हवामान विभागाने पाऊस मोजण्याचा पाच श्रेणी ठरवल्या असून, त्यानुसार अंदाज वर्तवण्यात येतो. यंदा 106 टक्के पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून, हवामान विभागाच्या श्रेणीनुसार हा सर्वाधिक पाऊस समजला जातो. पहिल्या श्रेणीनुसार 90 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस म्हणजे अपुरा पाऊस समजला जातो. दुसर्‍या श्रेणीत 90 ते 95 टक्के म्हणजे सरासरीपेक्षा कमी पाऊस, तर तिसर्‍या श्रेणीत 96 ते 104 टक्के म्हणजे सामान्य सरासरी इतका पाऊस समजला जातो. पुढील दोन श्रेणी सरासरीपेक्षा अधिक म्हणजे 105 ते 110 टक्के आणि 110 टक्क्यांच्या पुढे अधिक पाऊस म्हणजे सर्वाधिक पाऊस समजला जातो.

COMMENTS