Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिक्षक मतदार संघाची अशी असेल मतदान प्रक्रिया

नाशिक शिक्षक मतदारसंघात 21 उमेदवार निवडणूक रिंगणात

कोपरगाव शहर ः. महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव व नंदुरबार या पाच जिल्ह्यांचा विस्तार असलेल्या नाशिक विभाग शिक्षक मत

महामानवांचा अवमानप्रकरणी जामखेडकरांनी पाळला बंद
चौपदरी रस्त्यांचा 187 कोटींचा मंजूर निधी गेला परत
पाथर्डीत स्वररंग युवक महोत्सवाचे आयोजन

कोपरगाव शहर ः. महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव व नंदुरबार या पाच जिल्ह्यांचा विस्तार असलेल्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची बुधवार दि 26 जून रोजी मतदान प्रक्रिया संपन्न होत असून या मतदारसंघातील 54 तालुक्यातील 70 हजराहून अधिकचे शिक्षक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आपल्या न्याय हक्काच्या मागण्या शासन दरबारी मांडण्यासाठी व त्या सोडून घेण्यासाठी नाशिक शिक्षक मतदार संघातून उमेदवारी करत असलेल्या 21 उमेदवारांमधून एकाला शिक्षकांचा आमदार प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र राज्य विधान परिषदेत पाठवणार असून या निवडणुकी करीता मतदान प्रक्रिया खालील प्रमाणे असते.
शिक्षक मतदाराने आपले मत नोंदवण्यासाठी तेथील निवडणूक अधिकार्‍याने आपल्याला मतपत्रिकेसोबत दिलेला जांभळ्या रंगाचा स्केच पेंनचाच वापर करावा अन्य कोणताही पेन अथवा पेन्सिलचा वापर करू नये. आपल्याला आपल्या पसंतीच्या ज्या उमेदवाराला पहिल्यापसंतीचे मतदान द्यायचे असेल त्याच्या नावापुढील रकान्यात पसंती क्रमांक अंकात एक (1) हा अंक लिहावा. नाशिक शिक्षक मतदारसंघात 21 उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने आपण एका उमेदवाराला प्रथम पसंतीचे मतदान करू शकतो व उर्वरित उमेदवारांना 2,3,4 ते 21 असे पसंती क्रमांक टाकून ज्यांच्या त्यांच्या नावाच्या पुढील रकान्यात पसंती क्रमांकाने मतदान नोंदवू शकतो. पसंती क्रमांक केवळ अंकांमध्येच नोंदवा अक्षरी नोंदवू नका. पसंती क्रमांकाचा अंक नोंदवताना इंग्रजी, रोमन किंवा देवनागरी या भाषेचाच वापर करावा. मतपत्रिकेवर कोणत्याही प्रकारच्या खाणाखुणा, स्वतःचे नाव, सही असे कोणत्याही प्रकारचे लिखाण करू नये. आपली मतपत्रिका वैद्य ठरवण्याकरता पहिला पसंती क्रमांक कोणत्याही एका उमेदवाराच्या नावापुढे ’1’ हा अंक नमूद करणे आवश्यक आहे इतर पसंती क्रमांक टाकणे किंवा नोंदवणे हे केवळ ऐच्छिक आहे, बंधनकारक नाही. त्यामुळे आपल्या आवडीच्या निवडलेल्या उमेदवारापुढे पहिल्या पसंतीचा ’1’ हाच अंक नोंदवा इतर उमेदवारापुढे इतर पसंतीचे क्रमांक नाही टाकले तरी चालू शकेल.  मतदान वेळ बुधवार  26 जून रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत असेल. मतदान ठिकाण निवडणूक विभागाने प्रसिद्ध केल्या प्रमाणे ज्या त्या तालुक्यातील

COMMENTS