Homeताज्या बातम्याविशेष लेख

ही तर राजकीय गुगली ; शरद पवारांची मोठी खेळी

"आज भल्या सकालीस एका मोठ्या महानाट्य रंगत दिवसाची सुरुवात झाली.अतिशय रोमहर्षक आणि चित्तवेधक ने हे महानाट्य सुरू झाले.आणि ते संपता संपेनाच ओ , मार

सिक्कीममध्ये भूस्खलनात 6 जणांचा मृत्यू
मंत्री भुजबळांच्या अडचणीत पुन्हा वाढ
सावकाराच्या जाचास कंटाळून केली आत्महत्या

“आज भल्या सकालीस एका मोठ्या महानाट्य रंगत दिवसाची सुरुवात झाली.अतिशय रोमहर्षक आणि चित्तवेधक ने हे महानाट्य सुरू झाले.आणि ते संपता संपेनाच ओ , मारुतीच्या शेपटीप्रमाणे महाराष्ट्रातील मोठं मोठ्या दिग्गज नेत्यांनी आपल्या डोळ्यातून अश्रू गाळत आपल्या जाणत्या राजाला विनंती केली.” तुझं विन जनन ते मरण; तुझं विन मरण ते जनन ” अशी ती सावरकरांची कौण गाऊन आपल्या आधार वडाला त्याच्या निवृत्तीच्या निर्णयापासून बाजूला करण्याचा प्रयत्न केला पण ही निवृत्ती कशी आहेत ? 

काय आहेत हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत …..”  महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात पाच ते सहा दशकांपासून कार्यरत असणाऱ्या राष्ट्रवादीच्या शरद पवारांनी काल म्हणजे मंगळवारी २ मे रोजी निवृत्त होत असल्याचा खुलासा करत एक धक्का दिला. पवार साहेबांच्या ” लोक माझा सांगाती ” या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन सुरू असताना राजकीय भूकंप च घडवून आणला.त्यात भाषणात त्यांनी आज आपण निवृत्त होत असल्याची गुगली टाकली ….होय गुगलीच 

कारण त्यांनी आपला निर्णय जाहीर करत असताना ते चार ते पाच दिवस आजच्या या आपल्या निर्णयासाठी  एक व्यासपीठ तयार करून घेत एक एक स्पीच तयार करून घेतला ! विधानं केली ?  भाकरी करपल्यावर ती फिरवावी लागते , असं म्हणत संघटनेत मोठे बदल होत असल्याचे त्यांनी फक्त स्तुतोवाच केलं होतं . पण संघटनेतले बदल खांदेपालट सर्वच बाजूला राहिले आणि स्वतः शरद पवारच सक्रिय राजकारणातुन बाजूला होणार असल्याची घोषणा झाली.

‘  गंमत म्हणजे ती अशी पवार साहेब आपल्या राज्यसभेच्या खासदारकीची टर्म पूर्ण करणार आहेत.पक्षाच्या सगळ्या कार्यक्रमाना ते हजर देखील असणार आहेत. फक्त राष्ट्रीय अध्यक्ष या पदावरून ते स्वतःला बाजूला करताय’ खरी गंमत पुढेच आहेत ” ज्या पक्षाची राष्टीय मान्यताच मुळात निवडणूक आयोगाने काढून घेतली आहेत. पक्षाला निवडणूक आयोगाची परवानगीच नाहीत त्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कसा असू शकतो ” हा मोठा यक्ष प्रश्नच आहेत ? 

       प्रादेशिक पक्षाचा प्रांताध्यक्ष असतो त्या प्रमाणे जयंत पाटील आहेत त्यांच्याकडे परंतु ते ही बेसुमार रडत होते त्यांना बोलणे देखील जमत नव्हते., आव्हाड तर धाय मोकलून रडत होते ….मला वाटतं पुढच्या काही वर्ष्यात काय होईल याची एक झलक पाहत होतो .मुळात असं होऊच नये , सहज प्रश्न मनामध्ये आला पवार साहेब जे बोलतात ते कधीच करत नाहि मात्र मग आज जे बोलले त्यावर ते ठाम राहतील का ओ ते ? 

निवृत्तीची घोषणा यामागे काही खेळी तर नाही ना ? अशी खेळी जी आपल्या सर्वसामान्यांच्या व कार्यकर्त्यांच्या वर करून बघण्याचं धाडस यापूर्वी शिवसेना प्रमुख ठाकरे यांनी केलं होतं एकदा नाही दोनदा राजीनामाच देत असल्याचे सांगून जनमत अजमावल होत परंतु ते ठाकरे होते जनमत खरोखर त्यांना राजीनामा घेऊ देणार नाही हेच खरे । उलट शिवसेना बळकट झाली ” अगदी सेम टू सेम प्रकारे पवारांनी आपला राजकीय पत्ता टाकत आपल्या पक्षाचा राजकीय खुंटा पक्का करून घेतला आहेत यात तिळमात्र शंका नाहीत.

         कारण मागील काही दिवसांमध्ये अजित दादा हे बंडाच्या उंबरठ्यावरून मागे फिरलेले आहेत. आता जे आमदार त्यांच्या सोबत निघाले होते त्यांना पवार साहेबांनी पूर्णतः सूट दिली होती ज्यांना जायचं त्यांनी खुशाल जावं ! हा इशारा अजित दादांसाठी देखील होता ;  दादांना बंड करून एक स्वतंत्र गट घेऊन राष्ट्रवादी चा ताबा घ्यायचा होता . की जे शिंदे गटाने केले मात्र राष्ट्वादीच्या च्याव्या ह्या दादांच्या काकांकडे आहेत वर वर हवालदिल झालेले शरद पवार आपल्या पुतण्याच्या खेळीने नरमले देखील ! पण त्यांनी आपल्या घोषणेत राष्ट्रवादी पक्षाच्या बाजूने किती ? 

आपल्या बाजूने किती ? 

अजित दादाच्या बाजूने किती ?  याची पूर्णता चाचपणी केली !! 

आणि ती यशस्वी झाली आणि निकाल तुमच्या समोर च आहेत 

      ” हा तेल लावलेला पहिलवान सहजा सहजी नवख्या अजितदादा ला शरण जाणार नाहीत हेच त्यांनी आज दाखवून दिले”  

एका बाजूला कार्यकर्ते तावा तावात शरद पवारांच्या निर्णयाला विरोध करतात , दुसरीकडे हेमंत टकले पासून ते जयंत पाटील, भुजबळ, वळसे, सगळ्यांकडे “त्रासिक मुद्रेने” बघणारे अजित दादा म्हणत देखील असतील बस्स करणारे नवटंकी,..बस्स करा…. ते बऱ्याच जनावर डफरत देखील होते ये बस्स करा पुढे जाऊन त्यांनी माईकचा ताबा घेत पवार साहेब आता माघार घेणार नाहीत की जे त्यांनी सांगितले म्हणजे सांगितले ते राष्ट्रीय अध्यक्ष असतील किंवा नसतील त्यांच्या विना कुणी पक्षाची कल्पनाच करू नये . दादांनी आपल्या बोलण्यातून दाखवून दिले  वगैरे वगैरे …..

मात्र एक नक्कीच बोलता येईल त्यांचं बारीक लक्ष होत कार्यक्रमात कोण कोण किती रडत होत किती नवटंकी करतय ते बारीक बघत होते म्हणजे उद्याच्याला तुम्हास बघून घेतो .

        मला वाटत पवार साहेब वयाच्या ८२ व्या वर्षी एखाद्या सम्राटाप्रमाणे आपल्या आजच्या निर्णयाने सर्व राष्ट्रवादी गांगरून टाकली आहेत. सर्व पक्ष जनता माझ्या सोबत आहेत उद्या तुम्ही आमदार खासदार जरी घेऊन गेलात तर मी माझा उद्धव ठाकरे होऊ देणार नाहीत। ‘ मी शरद पवार आहेत आणि शरद पवारच राहणार ‘ या साठी त्यांनी हा ठासून गेमच केलाय हे नक्की.

      दोन दिवसांपासून सोसिअल साईडवर करपलेल्या भाकरीची चर्चा  सुरू असतानाच आज वेगळा विषय घेऊन राजकीय मुद्दा चर्चेत आणला याचा अर्थ असा की , शरद पवार सांगतील तेव्हाच भाकरी फिरेल , त्यांना वाटलं तर करपलेल्या भाकरीवर शरद पवार हीच सही असणार ! समजतंय का ? अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेने केलेला योग्य गेमच म्हणावा ! यात शंकेचे काही कारण नाही .

यात दुसरी बाजी निभावली ती सुप्रिया ताईंनी योग्य आणि दमदार व्यक्तिमहत्व कुठेही चूक झालेली नाहीत. अतिशय सावध भूमिका बजावली। यातून त्यांनी अजित दादांना अतिशय सॉफ्ट शॉक दिल्याचे चित्र दिसत होते। दादा हर प्रकारे आपल्या तर्हा बदलत होते वळसे पाटलांनी दाटून आलेल्या कंठाची मिमिक्री केली तेव्हाच कोण रे …..अशा अविर्भावात जो लूक / पोझिशन होती ला जवाब ! 

शेकडो ज्युनिअर आर्टिस्टच्या घोळक्यात एक अभिनय सम्राट आपल्या पत्नीसह अविचल चेहऱ्याने सर्वाना रोखत होता.हा बोल बाबा – हा बोल तू बोल …. पण त्यानेच लावलेल्या आगीत त्याचं टार्गेट त्याची शिकार चांगलीच होरपळत होती .हो खरोखर होरपळत होती ..अपेक्षा भंगाच्या दुःखान तरफडत होती. तीन तास झाले तरी हा तिढा सुटत नव्हता मग अजित दादांनीच  आता जेवणाची व औषधांची वेळ झाली म्हणू न सर्वांचे बुढ हलविले।

परंतु आजच मरण उद्यावर धकलय त्यांनी …

“पवार साहेब खरोखर थकलेले आहेत आज ते ८२ वर्षा चे आहेत मग त्यांनी आपले लढवय्ये व्यक्तिमत्व न विसरता  जाणीव करून दिली.  

शिक्षण ,क्रीडा, आरोग्य , शेती ,सहकार , अगदी सर्वं ठिकाणी ते अध्यक्ष होऊन गेले कित्येक ठिकाणी ते अजूनही अध्यक्षच आहेत  

मग मला सांगा “राष्ट्रवादी हे त्यांचे दुसरे अपत्य आहेत ” ‘ पहिले म्हणजे सुप्रिया ताई ‘  मग खरोखर ते अध्यक्षपद सहजासहजी सोडतील का ? 

मग हा आजचा ड्रामा कशासाठी होता ? याचे उत्तर शोधावेच लागेल 

समजा जरी दूर झाले तरी दुसरा अध्यक्ष हा त्यांच्या विश्वासातला असेल  मग तिथे सुप्रियाताई किंवा अजित दादा तर नाहीच कारण कारण घराणेशाही पुढे येते – अजितदादांना हा चान्स मिळणं अवघड आहेत असे खात्रीने वाटते.

समजा जर त्यांनी निवृत्ती घेतलीच तर ते कार्याध्यक्ष नेमतील पडद्याआड सर्व सूत्र स्वतः कडे ठेवतील भलेही पुढे येणार नाहीत परंतु लक्ष तेच ठेवतील यात शंका नाहीत.

मग असे देखील नाही की ! अजित दादांना लगाम लावण्यासाठी ही खेळी होती का ? तर उत्तर नाही असेच असेल 

कारण मित्रपक्ष देखील आज बोध घेतील आणि राष्ट्रवादी च्या आजच्या या निर्णयाने पक्षाचा बळकट झालेला खुंटा पुढे ठीक काम करेल अशी आशा आहेत. कारण पवार साहेबांनी आज एक निर्णय घेऊन सर्वांची मरगळ झटकून काढली आहेत. 

एवढेच स्पष्ट चित्र दिसते ! तुम्हास काय वाटतं नक्की सांगा …..थांबतो  धन्यवाद

योगेश रोकडे नाशिक 

9422892198

COMMENTS