पुणे/प्रतिनिधी ः रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर परिसरातील मरळ येथे भागीदारीत जमीन खरेदीतून भरपूर नफा मिळवून देतो असे सांगून एका व्यावसायिकाची साडे

पुणे/प्रतिनिधी ः रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर परिसरातील मरळ येथे भागीदारीत जमीन खरेदीतून भरपूर नफा मिळवून देतो असे सांगून एका व्यावसायिकाची साडेतेरा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आलेली आहे. याप्रकरणी तीन आरोपींवर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सलीम सय्यद शहा (वय-30), शर्मिला सलिम शाह (28) व जया सय्यद शहा (36, सर्व रा.कोंढवा, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहे. याबाबत प्रितेश कुवर भट्ट (36, रा. शेवाळेवाडी, पुणे) यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार मे 2018 पासून जून 2022 पर्यंत घडलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार प्रितेश भट्ट यांना रायगड जिल्हयातील मरळ येथे पार्टनरशिप मध्ये जमीन खरेदीतून चांगला नफा मिळवून देतो असे अमिष आरोपी शहा यांनी दाखवले. त्यानुसार त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांचेकडून एकूण 13 लाख 50 हजार रुपये रोख व ऑनलाइन स्वरुपात घेऊन त्यांना जमीन देण्याचे कबूल केले. परंतु जमीन किंवा पैसे परत न करता, त्यांनी पैशांची मागणी केली असता, त्यांना आरोपींनी बघून घेण्याची धमकी देऊन शिवीगाळ करुन पैसे परत न देता त्यांची फसवणुक करण्यात आली आहे. यबााबत पोलिस उपनिरीक्षक एस वगरे पुढील तपास करत आहे.
COMMENTS