Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तहानलेल्या शाकीरदरावाडीचा पिण्याच्या पाण्याचा संघर्ष संपला

अहमदनगर प्रतिनिधी - अकोले तालुक्यातील कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी वसलेल्या बारी, जहागीरदार वाडी, चिचोंडी, मूरशेत, पांजरे या आदिवासी गावांमध्

आनंदऋषीजी हॉस्पिटलने आरोग्यसेवेतून माणुसकी धर्म जपला ः आरिफ शेख
कीर्तनकार इंदोरीकर महाराज रस्ते अपघातात किरकोळ जख़मी
साधूसंतांचा व देवीदेवतांचा अवमान करणार्‍यांना मतदान करणार नाही : वारकरी संप्रदायाचा ठराव

अहमदनगर प्रतिनिधी – अकोले तालुक्यातील कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी वसलेल्या बारी, जहागीरदार वाडी, चिचोंडी, मूरशेत, पांजरे या आदिवासी गावांमध्ये जलस्रोत निर्मितीसाठी व पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होत आहेत. प्रकल्पातील पांजरे गावातील शाकीरदरावाडी मध्ये देश स्वतंत्र झाल्यापासून अद्यापपर्यंत पिण्याच्या पाण्याची वणवण थांबली नव्हती. ही बाब लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने या समस्येवर कायमस्वरूपी उपाय योजना करण्यात आलीय आहे. 

ठाकर समाजाची सुमारे 25 घरे  कळसुबाई परिसरातील डोंगराच्या कुशीत अनेक वर्षापासून वास्तव्यास आहेत. जोरदार पावसाचा हा प्रदेश मानला जातो. अगदी कळसुबाई शिखराच्या मागील बाजूस पायथ्याशी असलेले पांजरे हे आदिवासी बहुल गाव आहे. बहुतेक ठाकर समाजाची लोक वस्ती असलेले अतिदुर्गम गाव म्हणून याची नोंद आहे. ए.एस.के फाउंडेशन मुंबई व बायफ संस्था संचलित समृद्ध किसान प्रकल्प अंतर्गत तात्काळ अंदाजपत्रक तयार करून मंजूर करून घेण्यात आले. सुमारे एक महिन्याच्या कालावधीतच विहीर खोदून बांधकाम नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. भर उन्हाळ्यात विहिरीला असलेले भरपूर पाणी बघून ग्रामस्थ सुखावले आहे. शाश्वत आणि वर्षभर पुरणारे पाणी वाडी जवळच उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साह संचारला आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सुमारे साडेपाच लाख रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. 

COMMENTS