Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरी तालुक्यात वीज पंप चोरणारी तिसरी टोळी जेरबंद

देवळाली प्रवरा ः राहुरी तालुक्यात इलेक्ट्रिक वीज पंप चोरणारी तिसरी टोळी पकडण्यात आली. या टोळीतील तीन जणांना जेरबंद करण्यात राहुरी पोलिसांना यश आल

कृष्णानंद महाराजांचा बाल अनाथाश्रम मानवसेवेचे तीर्थक्षेत्र ः डॉ. बाबुराव उपाध्ये
मा. नामदार आशुतोषदादा काळे यांच्या वाढदिवसानिमित्त जनता इंग्लिश स्कूल संवत्सर विद्यालयात शालेय वस्तूचे वाटप.
बेड, इंजेक्शन व ऑक्सिजनसाठी स्वयंसेवी संस्थांचे ठिय्या आंदोलन

देवळाली प्रवरा ः राहुरी तालुक्यात इलेक्ट्रिक वीज पंप चोरणारी तिसरी टोळी पकडण्यात आली. या टोळीतील तीन जणांना जेरबंद करण्यात राहुरी पोलिसांना यश आले असून या टोळीकडून 35 हजार किमंतीचे इलेक्ट्रिक वीज पंप जप्त करण्यात आले आहे.
        याबाबत पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील जातप येथिल श्याम शरद शिंदे यांच्या शेतामधील विहिरीमध्ये असलेली इलेक्ट्रिक विज पंप चोरी झाल्याची फिर्याद राहुरी पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस तपासाच्या सुचना दिल्या. गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करताना जातप येथिल ग्रामस्थांनी संशयितांची नावे पोलिसांना सांगितली.त्या अधारे तपास केला. राहुरी पोलिसांनी श्रीरामपूर तालुक्यातील कान्हेगाव येथील कैलास शामराव सोनवणे (वय 25 वर्ष),देविदास रोहिदास मोरे (वय 27 वर्ष), अविनाश विश्‍वनाथ पवार (वय 30 वर्ष) या तिघांना संशयित म्हणून ताब्यात घेतले.पोलिसांनी चौकशी केली असता उडवा उडवीचे उत्तरे दिली.पोलिसांनी खाक्या दाखवताच तिन आरोपींनी इलेक्ट्रिक विज पंप चोरीची कबुली दिली. 35 हजार रुपये किमतीच्या 3 इलेक्ट्रिक विज पंप आरोपीने बंधार्‍या लगतच्या ओढ्यातून काढून दिल्या. तिनही इलेक्ट्रिक विज पंप तपासी अधिकारी सहाय्यक फौजदार  विष्णू आहेर यांनी जप्त केले.हे तिनही आरोपी संघटित होऊन गुन्हे करीत असल्याने संघटित गुन्ह्याचे कलम 112 (2) वाढवून न्यायालयापुढे हजर केले असता राहुरी न्यालयाने 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली सरकार पक्षाच्या वतीने  सरकारी अभियोक्ता अँड रवींद्र गागरे यांनी  बाजू मांडली. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक  राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबरमे, उपविभागीय पोलिस अधिकारी बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, सहायक फौजदार  विष्णू  आहेर यांच्यासह हे.कॉ. विकास साळवे,सुरज गायकवाड, संदीप ठानगे, पो.ना. प्रवीण  बागुल, पो.काँ. प्रमोद ढाकणे, सचिन ताजणे, नदीम शेख, अंकुश भोसले, सतीश कुर्‍हाडे आदींनी केला आहे.

COMMENTS