Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आंबेवाडी शिवारात दरोड्याच्या तयारीत असलेल्या चोरांच्या आवळल्या मुसक्या

कडा प्रतिनिधी - अंभोरा पोलीस ठाणे अंतर्गत येणार्‍या आंबेवाडी शिवारात अहमदनगर ते बीड महामार्गालगत असलेल्या अर्जुन बबन बागले यांच्या शेतात सुजलॉन  

वाळू तस्कराचा महसूल पथकातील तलाठ्यावर हल्ला
सावत्र बापाने मुलीला नदीत ढकलले
पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने आपले कर्तव्य ओळखून योगदान द्यावे-सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

कडा प्रतिनिधी – अंभोरा पोलीस ठाणे अंतर्गत येणार्‍या आंबेवाडी शिवारात अहमदनगर ते बीड महामार्गालगत असलेल्या अर्जुन बबन बागले यांच्या शेतात सुजलॉन  कंपनीच्या पवनचक्कीच्या साहित्याची चोरी करण्याच्या उद्देशाने रविवारी मध्यरात्री सहा दरोडेखोर डम्पर व जेसीबी सह आले असता अंभोरा पोलिसांनी पाच आरोपींना पाठलाग करून पकडले तर एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला. एक डंपर व जेसीबी असा पंचवीस लाख रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी ताब्यात घेतला आहे. सदरील आरोपींना सोमवारी आष्टी येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांना आंबेवाडी शिवारात सहा दरोडेखोर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती मिळाली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी उपनिरीक्षक अदिनाथ भडके, पोलीस अंमलदार अमोल शिरसाठ, सतीष पैठणे, सुदाम पोकळे सहाय्यक फौजदार शांताराम रोकडे व पोलीस कॉन्स्टेबल बाळू जगदाळे यांना तात्काळ सदरील ठिकाणी पाठवले असता रविवारी मध्यरात्री एक डम्पर व एक जेसीबी घेऊन सहा व्यक्ती संशयास्पदरीत्या आढळले. पोलिसांना  पाहताच ते पळून जात असतानाच कृष्णा सर्जेराव दळवी वय 28 वर्षे, रा. सारसनगर, अहमदनगर, अमोल नारायण खडके वय 30 वर्षे, रा. चिचोंडी पाटील, ता. जि. अहमदनगर कैलास पांडूरंग वाडेकर वय 32 वर्षे, रा. चिचोंडी पाटील, ता.जि. अहमदनगर, निखील दत्तात्रय खोले वय 27 वर्षे, रा. नारायणगव्हाण, ता. पारनेर, जि. अहमदनगर, संतोष काशिनाथ फसले वय 28 वर्षे, रा. दौलावडगाव, ता. आष्टी, जि. बीड अशा पाच व्यक्तींना  पाठलाग करून पकडले. तर संकेत भाऊ बेरड रा. निंबोडी, ता. जि. अहमदनगर हा पळून गेला असून अंभोरा पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सहाय्यक फौजदार शांताराम सुर्यभान रोकडे यांच्या फिर्यादीवरून अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी सदरील आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

COMMENTS