अहमदनगर प्रतिनिधी - सोन्या-चांदीचे दागिने व वाहनांची चोरी होत असतानाच आता चोरट्यांनी शेतातील पिकांची चोरी सुरू केली आहे. कापूस, सोयाबीन व अन्य शे

अहमदनगर प्रतिनिधी – सोन्या-चांदीचे दागिने व वाहनांची चोरी होत असतानाच आता चोरट्यांनी शेतातील पिकांची चोरी सुरू केली आहे. कापूस, सोयाबीन व अन्य शेतीपिके चोरून नेण्याच्या घटना वाढल्या आहेत. अकोले तालुक्यात शेत जमिनीतून उडीद व खुरासणीच्या पिकांची चोरी झाली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अकोले तालुक्यातील केळीकोतुळ शिवारातील शेत जमिनीतील पिकातून एक एकर शेतातील पंधरा हजार रुपये किमतीची उडीद व खुरासणीचे पीक चौघांनी चोरून नेले तसेच शेत जमीन नांगरून पिकाचे नुकसान केले व पिक लपून ठेवले. या प्रकरणी अकोले पोलिसांनी शांताराम लक्ष्मण वायाळ (वय 52, राहणार केळीकोतुळ, तालुका अकोले) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कमल गोपीनाथ वायाळ, शीतल प्रदीप वायाळ, विनायक हनुमंता भोजने व आशा विनायक भोजने (चौघे राहणार केळी कोतुळ, तालुका अकोले) यांच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलिस उप निरीक्षक गवारी करीत आहे.
COMMENTS