पुणे प्रतिनिधी - जबरी चोरी करणार्या चोरट्यांनी पलायन करताना एका पादचार्याला चिरडल्याचा प्रकार समोर आला आहे. जबर चोरी करणाऱ्या चोरट्यांनी विमानतळ पर
पुणे प्रतिनिधी – जबरी चोरी करणार्या चोरट्यांनी पलायन करताना एका पादचार्याला चिरडल्याचा प्रकार समोर आला आहे. जबर चोरी करणाऱ्या चोरट्यांनी विमानतळ परिसरातून गाडी चोरली. त्यानंतर वानवडी येथील कृष्णा नगर(Krishna Nagar) परिसरातून चोरट्यांनी गाडी फिरवली. यादरम्यान त्यांची गाडी वेगात होती. दरम्यान गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि चोरट्यांनी एका पादचार्याला भरधाव वेगात चिरडलं. त्यामध्ये पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. हा थरार सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे. रामेश्वर चमन पंडीत(Rameshwar Chaman Pandit) असे मृत झालेल्या व्यक्तीचं नाव असून, तो मुळचा झारखंड येथील आहे.
COMMENTS