Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कार थांबवून प्रवाशांना लुटले

पुणे/प्रतिनिधी ः  कारमधून प्रवास करणार्‍या तरुणांना ओव्हरटेक करुन थांबण्याचा इशारा करीत टोळक्याने त्यांना शिवीगाळ केली. तसेच लुटमार करण्याच्या उद

मनसेकडून जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड I LOKNews24
अणुऊर्जा क्षमता 2031-32 पर्यंत तिप्पट होईल
रुग्णांसाठी न्यू लाईफ हॉस्पिटल संजीवनी ठरणार : आ. प्रा. राम शिंदे

पुणे/प्रतिनिधी ः  कारमधून प्रवास करणार्‍या तरुणांना ओव्हरटेक करुन थांबण्याचा इशारा करीत टोळक्याने त्यांना शिवीगाळ केली. तसेच लुटमार करण्याच्या उद्देशाने ’आम्हाला कट का मारला, तुमच्या गाडीचे हप्ते किती थकले आहेत, गाडी जमा करतो’ असे म्हणत बळजबरीने गाडी चोरुन नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुणांनी प्रतिकार केल्यामुळे चोरटे पसार झाल्याची घटना पुणे-अहमदनगर रस्त्यावर उरळी कांचन ते सोरतापवाडी परिसरात घडली आहे.
याप्रकरणी कृष्णा कदम (वय- 28, रा. हनुमानवाडी, केळगाव,पुणे) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार तिघा आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा कदम आणि त्यांचा मित्र सचिन नावडकर हे कार मधून प्रवास करीत होते. त्यावेळी पाठीमागून कारमधून आलेल्या तिघांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला. त्यामुळे कृष्णाने गाडी थांबविली असता, तिघांनी त्यांना शिवीगाळ केली. आमच्या गाडीला कट मारुन का आलात, असे म्हणत चोरट्याने सचिनच्या कानातील सोन्याची बाळी बळजबरीने हिसकावण्याचा प्रयत्न केला.

COMMENTS