Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आजकाल तृतीयपंथीयही आमदार होतात

जीभ घसरल्यानंतर आमदार बच्चू कडूंनी मागितली माफी

जळगाव : बोलण्यात दम नसतो, ज्याच्या ओठावर मिशी नसते, चालतो तेव्हा बाई आहे की, माणूस ते पण कळत नाही, असे लोकही आजकाल आमदार होतात. तृतीयपंथीयही आमदा

जांभा बु.च्या १०० टक्के पुनर्वसनाचा प्रस्ताव तयार करा – पालकमंत्री बच्चू कडू
भाजपच्या एकाही नेत्याची ईडी चौकशी का नाही ?
शरद पवार भाजपचा गेम करतील अशी अवस्था

जळगाव : बोलण्यात दम नसतो, ज्याच्या ओठावर मिशी नसते, चालतो तेव्हा बाई आहे की, माणूस ते पण कळत नाही, असे लोकही आजकाल आमदार होतात. तृतीयपंथीयही आमदार होतात असे वादग्रस्त वक्तव्य प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. वास्तविक आपली चूक लक्षात आल्यावर बच्चू कडू यांनी लगेचच माफी देखील मागितली आहे.
आंडू-पांडू लोक आमदार होतात असे मला म्हणायचे होते. पण मी चुकीचा शब्द बोलून गेलो त्याबद्दल माफी मागतो, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांची सभेत बोलताना जीभ घसरली होती. मात्र, त्यांना या बद्दल प्रश्‍न विचारण्यात आल्यावर लगेचच त्यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच या चूकीबद्दल माफीही मागितली. तसेच आपल्याला तसे म्हणायचे नव्हते. पण आपण बोलण्याच्या ओघात तसे बोलून गेलो असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे. आमदार बच्चू कडू यांच्या संभेचे आयोजन जळगाव जिल्ह्यात करण्यात आले होते. त्या वेळी आमदार बच्चू कडू यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. बच्चू कडू म्हणाले की, मी आमदार होणार की नाही? याची मला पर्वा नाही. मात्र शेतकर्‍यांची पर्वा असणारा आमचा पक्ष आहे. वास्तविक आज काल तृतीयपंथीयही आमदार होतात असे वक्तव्य त्यांनी केले. जळगावातल्या शेतकरी संवाद मेळाव्यात हे वक्तव्य त्यांनी रविवारी केलं. याबाबत प्रश्‍न विचारला असता त्यांनी आता माफी मागितली आहे. या संदर्भात बोलताना आमदार बच्चू कडू म्हणाले की, शेतकरी मेळाव्यातल्या भाषणात आपण जे बोललो ते चुकीचे होते. आंडू-पांडू लोक आमदार होतात असे मला म्हणायचे होते. मी चुकीचा शब्द बोलून गेलो त्याबद्दल माफी मागतो. जळगावातील सावदा इथे काँग्रेसच्या रॅलीत एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला होता. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत ही रॅली काढण्यात आली होती. या घटनेचाही बच्चू कडू यांनी कडक शब्दात समाचार घेतला. कॉलेज आणि शाळांमधील मुलांचा वापर पक्षाच्या कामासाठी होता कामा नये. एखादी संस्था असे करत असेल तर अशा संस्था बंद केल्या पाहिजेत, अशी मागणी देखील आमदार बच्चू कडू यांनी केली. संबंधितांवर कारवाईची मागणी देखील बच्चू कडू यांनी केली आहे.

COMMENTS