Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिंदे गटात लवकरच स्फोट होईल

संजय राऊत यांचे वक्तव्य

नाशिक प्रतिनिधी - राज्यात सध्या बेताल वक्तव्याने टोक गाठले असून, शिंदे गट-विरुद्ध ठाकरे गटात जोरदार सामना रंगतांना दिसून येत आहे. दोन्ही गटांती

संजय गायकवाडांची संजय राऊतांवर टीका
राऊत-दानवेंच्या अडचणी वाढणार ?
संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ.

नाशिक प्रतिनिधी – राज्यात सध्या बेताल वक्तव्याने टोक गाठले असून, शिंदे गट-विरुद्ध ठाकरे गटात जोरदार सामना रंगतांना दिसून येत आहे. दोन्ही गटांतील नेते एकमेकांच्या विरोधात जोरदार टीका करतांना दिसून येत आहेत. संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे. शिंदे गटात लवकरच मोठा स्फोट होणार असून लवकरच तो होईल. पालापाचोळा हा उडत असतो तसा तो शिवसेनेतून उडून गेला असून शिंदे गटात गेलेल्या आमदार-खासदारांनी पुन्हा निवडून दाखवावे, असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
खासदार संजय राऊत नाशिक दौर्‍यावर आहेत. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पत्रकारांशी देखील त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी वरील टीका केली. दादा भुसे आणि सुहास कांदे यांच्याबाबत बोलतांना राऊत म्हणाले, मी खासदार असलो, तरी त्यापूर्वी एक क्राईम रिपोर्टर होतो. माझा पिंड पत्रकाराचा आहे. त्यामुळे कोणाच्या डोक्यात काय सुरू आहे, ते मला चांगले कळते. शिंदे गटात काय सुरू आहे, हे मला माहिती आहे आणि लवकरच त्याचा स्फोट होईल, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे. राऊत म्हणाले, काही आमदार सोडून गेले म्हणून शिवसेना संपली असे नाही. पालापाचोळा हा उडत असतो. त्या प्रमाणे 40 आमदार उडून गेले आहेत. असे असले तरी पक्ष आजही जमीनीवर आहे. महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी तुम्ही निवडणुका घेतल्या, तरी आम्ही जिंकून येऊ. महानगरपालिका असेल किंवा अन्य निवडणुका असतील या निवडणुका भीतीपोटी टाळल्या जात आहेत. शिवसेना नवीन चिन्हावरसुद्धा विजयी होईल, शिवसेनेला कुठेही तडा गेला नाही असा विश्‍वास राऊत यांनी व्यक्त केला. राऊत म्हणाले, भाजपला मोदी यांच्या झालेला अपमान दिसतो. मात्र, शिवरायांचा होणारा अपमान मात्र, त्यांना दिसत नाही. आम्ही सतत लोकांमध्ये फिरतो आहे. लोकांच्या मनात गद्दारांबद्दल चीड आहे. लोकं शिवसेनेच्या पाठिशी भक्कमपणे उभी आहेत.

COMMENTS