Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सरकारी नोकरीत येणार्‍या दिव्यांगांची होणार तपासणी

पूजा खेडकर प्रकरणानंतर राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

मुंबई : दिव्यांगत्वाचे खोटे प्रमाणपत्र सादर करून पूजा खेडकर या तरूणीने आयएएसची नोकरी मिळवली होती. मात्र याप्रकरणाचे बिंग फुटल्यानंतर तिला निलंबित

लखनऊमध्ये प्रियांका चोप्राचा निषेध
“ईडी”चा फास
राज्यावर पुन्हा अवकाळीचे संकट

मुंबई : दिव्यांगत्वाचे खोटे प्रमाणपत्र सादर करून पूजा खेडकर या तरूणीने आयएएसची नोकरी मिळवली होती. मात्र याप्रकरणाचे बिंग फुटल्यानंतर तिला निलंबित करत भविष्यात तिला यूपीएससीच्या कोणत्याही परीक्षा देता येणार नाही. मात्र यासोबतच राज्य सरकारने बुधवारी महत्वपूर्ण निर्णय घेत सरकारी नोकरीत येणार्‍या दिव्यागांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिव्यांगाचे खोटे प्रमाणपत्र मिळवून त्याचा लाभ घेणार्‍यांना यामुळे चाप बसणार आहे.
शासकीय निधी प्राप्त होणार्‍या संस्थांमध्ये विभागांमध्ये नियुक्त होणार्‍या उमेदवारांच्या दिव्यांगत्वाची तपासणी करण्याबाबतचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे, आता सर्वच शासकीय नोकरी व अनुदानित संस्थांमध्ये नोकरी करणार्‍या दिव्यांगांच्या प्रमाणपत्राची तपासणी करण्यात येणार आहे. दिव्यांगत्वाची काटेकोरपणे तपासणी करण्याबाबत शासनाने आदेश जारी केला आहे. शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या शासन निर्णयात महत्त्वाचे आदेश देण्यात आले आहेत. शासकीय नोकरी आणि विविध संस्थांमध्ये चार टक्के दिव्यांगांसाठी आरक्षणाची तरतूद आहे. असे असताना काही बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या तक्रारी प्राप्त होत असून या बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे दिव्यांगांना मिळणार्‍या शासकीय नोकरीतील लाभ मिळवला जात दिव्यांग कल्याण विभागाकडून हा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या निर्णयात म्हटले आहे की, दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत सदर उमेदवार संबंधित पदावर नियुक्तीसाठी सक्षम आहे किंवा नाही याची वैद्यकीय मंडळाकडून तपासणी करण्यात यावी, तसेच या उमेदवारांच्या दिव्यांगत्वाची वैद्यकीय तपासणी करण्याबाबत आणि सदर वैद्यकीय पडताळणीअंती निदर्शनास आलेले त्यांच्या दिव्यांगत्वाचे प्रमाण त्यांच्या वैद्यकीय अहवालामध्ये नमूद करण्याबाबत देखील संबंधित वैद्यकीय मंडळास सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना सूचित करण्यात येते की, शासन परिपत्रकानुसार केंद्र शासनाच्या धर्तीवर दिव्यांगत्वासंदर्भातील सर्व लाभ मिळवण्यासाठी वैश्‍विक ओळखपत्र बंधनकारक करणेबाबत सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे खोटे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून सरकारी नोकरी करणार्‍यांना चाप बसणार आहे.

COMMENTS