Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात उडणार सभांचा धुरळा ; पंतप्रधान मोदी घेणार महाराष्ट्रात 8 सभा

मुंबई ः राज्यात विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडाला असून, महायुती आणि महाविकास आघाडीकडून बहुतांश जागांवर आपले उमेदवार जाहीर झाले आहेत. तर दुसरीकडे का

निकृष्ट दर्जाच्या गणवेशाची उच्च न्यायालयाने घेतली दखल
राजकीय सूड उगवण्यासाठी 30 कोटी केले शासनाला परत
आपल्या जीवनात कायम आनंदी राहा-ह.भ.प. मोहन महाराज खरमाटे

मुंबई ः राज्यात विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडाला असून, महायुती आणि महाविकास आघाडीकडून बहुतांश जागांवर आपले उमेदवार जाहीर झाले आहेत. तर दुसरीकडे काँगे्रस आणि शरद पवार यांच्याकडून अजूनही उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत. मंगळवारपासून राज्यात उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली असून, 29 ऑक्टोबर उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असणार आहे. त्यानंतर बुधवारी 30 ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी होणार असून, 4 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस असेल. त्यामुळे 4 नोव्हेंबरनंतरच राज्यातील लढती स्पष्ट होणार आहे. त्यानंतर राज्यात वरिष्ठ नेत्यांच्या सभांचा धुरळा उडणार आहे.
महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असून ते तब्बल 8 सभा महाराष्ट्रात घेणार आहेत. पंतप्रधान मोदी 7 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर महाराष्ट्रात तळ ठोकून असणार आहेत. या 8 दिवसांत ते विविध मतदारसंघात जाहीर सभा घेतील. पंतप्रधान मोदी 14 नोव्हेंबरपासून परदेश दौर्‍यावर जाणार आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रचारासाठी फारसा वेळ नसणार. त्यामुळे या 8 दिवसांत मोदींच्या जास्तीत जास्त सभा घेण्यावर महायुती भर देईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ भाजपच नाही तर महायुतीच्या घटक पक्षातील उमेदावारांच्या प्रचारासाठी सुद्धा सभा घेतील. तर दुसरीकडे काँगे्रस नेते खासदार राहुल गांधी महाराष्ट्रात किती सभा घेणार ते स्पष्ट नसले तरी, राहुल गांधी 4 नोव्हेंबर महाराष्ट्रात सभा घेणार आहेत. यासोबत आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल देखील महाविकास आघाडीचा काँगे्रस वगळता इतर दोन पक्षांचा प्रचारासाठी सभा घेणार असल्याचे समोर आले आहे. केजरीवाल महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार तसेच इतर घटक पक्षांचा प्रचार करणार आहेत. मात्र, ते काँग्रेसचा प्रचार करणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. अरविंद केजरीवाल यांची राज्यात विभागवार सभा होणार असल्याची देखील माहिती आहे. महाराष्ट्रात आम आदमी पक्षाचे संघटन काहीच भागात असून त्या मतदानाचा फायदा महायुतीला होऊ द्यायचा नाही, याची खबरदारी महाविकास आघाडीने घेतली आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून अरविंद केजरीवाल यांना प्रचाराचे निमंत्रण देण्यात आले आहे.

18 नोव्हेंबरपर्यंत सभांचा धडाका
विधानसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी 18 नोव्हेंबरपर्यत वेळ दिला आहे. त्यामुळे राज्यभरात मोठमोठ्या नेत्यांच्या जाहीर सभांचा धडाका राहणार आहे. विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी असा थेट सामना होणार आहे. दोघांकडूनही मोर्चंबांधणी करण्यात येत असून स्टार प्रचारकांच्या सभांकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदार होणार असून 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे.

COMMENTS