पुणे : महात्मा फुले यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून महात्मा फुले वाडा येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी ईव्हीएमला विरोध करत आ
पुणे : महात्मा फुले यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून महात्मा फुले वाडा येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी ईव्हीएमला विरोध करत आत्मक्लेश आंदोलनाला सुरूवात केली आहे. या आंदोलनाला शनिवारी खासदार शरद पवार यांनी पाठिंबा देत आढाव यांचे ऐकून घेतले. त्यानंतर माध्यमांशी बोलतांना शरद पवार म्हणाले की, काही लोकांनी ईव्हीएम कसे सेट केले जाते, याचे आम्हाला प्रेझेंटेशन दिले होते. आमची कमतरता होती की, आम्ही त्यावर विश्वास ठेवला नाही. मात्र निवडणुकीतील गैरव्यवहार रोखण्यासाठी जनतेतून उठाव होणे गरजेचे असल्याचे मत पवार यांनी नोंदवले.
खा. पवार पुढे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्यासंबंधीची अस्वस्थता संपूर्ण राज्यात दिसत आहे. निवडणुकीत झालेली अनियमितता पाहून बाबा आढाव यांनी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीत झालेला सत्तेचा गैरवापर आणि पैशांचा महापूर याआधी कधीही पाहायला मिळाला नव्हता. स्थानिक पातळीवरील निवडणूक असतात, त्यामध्ये अशा तक्रारी कुठे न कुठे ऐकायला मिळतात. मात्र संपूर्ण राज्याची आणि देशाची निवडणूक असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा आणि सत्तेचा गैरवापर हा करून निवडणुकीची सर्व यंत्रणा हातात घ्यायची, असे चित्र यापूर्वी कधीही दिसले नव्हते, असे देखील पवार यांनी म्हटले आहे. असेच काही या निवडणुकीत महाराष्ट्रात घडले आहे आणि त्याचा परिणाम होऊन लोकांची अस्वस्थता वाढली असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.
COMMENTS