Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माफी मागण्याचा प्रश्‍नच नाही : सपकाळ

पुणे : काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी पुण्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची तोफ डागत त्यांचा क

ज्यांनी जीवन घडविले तेच माझ्या लेखनाचे आदर्श : डॉ. बाबुराव उपाध्ये
बारवी धरणाकरिता अतिरिक्त जमिन संपादित करून शेतकऱ्यांना मोबदला देणार : मंत्री उदय सामंत
देहराडूनच्या राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज प्रवेश परीक्षा अर्ज भरण्यास १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

पुणे : काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी पुण्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची तोफ डागत त्यांचा कारभार तुघलकी असल्याचे म्हटले आहे. शिवाय मी माझ्या विधानावर ठाम असल्यामुळे माफी मागण्याचा प्रश्‍नच येत नसल्याचे देखील सपकाळ यांनी स्पष्ट केले आहे. तसेच एकनाथ शिंदे हे मला माफी मागा नाही तर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करतो, असे म्हणत धमकावत आहे, असे काँग्रेस सपकाळ यांनी म्हटले आहे.
सपकाळ पुढे बोलताना म्हणाले की, मी कोणाबद्दल एकेरी बोललो नाही, अवमानजनक बोललो नाही. मग माफी का मागावी. सरकारकडून प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांच्यावर कोणती कारवाई झाली नाही त्याबाबत बोलले जात नाही, असेही त्यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

COMMENTS