Homeताज्या बातम्यादेश

जुनी पेन्शन लागू करण्याचा विचार नाही

खा. प्रणिती शिंदेंच्या प्रश्‍नावर सरकारचे उत्तर

नवी दिल्ली : महाराष्ट्र असो वा केंद्र सरकार असो, सरकारी कर्मचार्‍यांकडून जुनी पेन्शन लागू करण्याची सातत्याने मागणी करण्यात येत आहे. यासंदर्भात सो

विरोधी सत्तेत असताना प्लॅंचेट, आता जोतिष ! 
लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा बळी
मुख्यमंत्र्यांना चेष्टा-मस्करी करण्याची सवय… नाना पटोलेंची मिश्किल प्रतिक्रिया

नवी दिल्ली : महाराष्ट्र असो वा केंद्र सरकार असो, सरकारी कर्मचार्‍यांकडून जुनी पेन्शन लागू करण्याची सातत्याने मागणी करण्यात येत आहे. यासंदर्भात सोमवारी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशना सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी जुनी पेन्शन लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक आहे का, असा लेखी प्रश्‍न विचारला. मात्र सरकारने लेखी उत्तर देत जुनी पेन्शन लागू करण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचार्‍यांची निराशा झाली आहे.
जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात सरकारचा कोणताही विचार नाही, असे स्पष्ट शब्दात केंद्र सरकारने खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रश्‍नावर दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे. जुन्या पेन्शन योजनेबाबत काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारला प्रश्‍न विचारला होता. राज्य व केंद्रातील सरकारी कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासाठी सरकारची काही योजना आहे का?, असा प्रश्‍न प्रणिती शिंदे यांनी संसद सभागृहातील उपस्थितीदरम्यान विचारला. मात्र, यासंदर्भातील प्रश्‍नावर सरकारने दिलेल्या उत्तराने कोट्यवधी सरकारी कर्मचार्‍यांची निराशा होणार आहे. जुनी पेन्शन योजनेबाबत सरकार चा कोणताही विचार नाही, असे स्पष्ट उत्तर केंद्र सरकारने दिले आहे. त्यामुळे, गेल्या अनेक वर्षापासून जुन्या पेन्शन योजनेबाबत आक्रमक असलेल्या सरकारी कर्मचार्‍यांची घोर निराशा झाली आहे. आता, सरकारी कर्मचारी पुन्हा आंदोलनाचा किंवा संपाचा मार्ग अवलंबतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. जुनी पेन्शन लागू करण्यासाठी सरकारी कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून आग्रही आहेत. या कर्मचार्‍यांच्या संघटनांकडून सातत्याने सरकारकडे जुनी पेन्शन योचजना लागू करण्याची मागणीही केली जात होती. आता, विरोधी पक्षातील नेत्यांनी कर्मचार्‍यांच्या या मागणीला पाठिंबा दर्शवत संसद सभागृहात हा प्रश्‍न उपस्थित केला. खासदार प्रणिती शिंदेनी उपस्थित केलेल्या या प्रश्‍नावर सरकारने लेखी उत्तर दिले असून जुनी पेन्शन लागू करण्याचा कुठलाही विचार नसल्याचे म्हटले आहे.

COMMENTS