लम्पी आजाराबाबत शेतकऱ्यांमध्ये जाणीव जागृती होणे गरजेचे- डॉ. तुंबारे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लम्पी आजाराबाबत शेतकऱ्यांमध्ये जाणीव जागृती होणे गरजेचे- डॉ. तुंबारे

संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर तालुका हा दुधाचा तालुका म्हणून ओळखला जात असून या तालुक्यात मोठे पशुधन आहे. सध्या काही भागात लम्पी हा आजार संसर्गजन्य वाढत

बचतीच्या पैशातून विद्यार्थ्यांकडून दिलेले गणवेश कौतुकास्पद ः मंगेश पाटील
रामशिंग बाबांचा जंगी यात्रा उत्सवाचे उद्या आयोजन
‘त्या’ तीन महिलेचा खून करून जाळलं | DAINIK LOKMNTHAN

संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर तालुका हा दुधाचा तालुका म्हणून ओळखला जात असून या तालुक्यात मोठे पशुधन आहे. सध्या काही भागात लम्पी हा आजार संसर्गजन्य वाढत असून त्यावर वेळीच काळजी घेतली तर या आजाराचा प्रादुर्भाव आपण रोखू शकतो .म्हणून या आजाराचे प्राथमिक लक्षणे ,त्यावर करावयाच्या उपायोजना याबाबत शेतकऱ्यांमध्ये जास्तीत जास्त जाणीव जागृती करा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे यांनी केले असून शेतकऱ्यांनी या आजाराबाबत अधिक दक्षता घ्यावी असे आवाहन दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी केले आहे

संगमनेर तालुका सहकारी दूध संघाच्या वतीने तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकारी जिल्हा परिषद पंचायत समितीचे शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी यांचे लम्पी या आजाराबाबत चर्चासत्र घेण्यात आले यावेळी ते बोलत होते याप्रसंगी अध्यक्षस्थानी राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख हे होते. तर व्यासपीठावर सहाय्यक पशुसंवर्धन उपायुक्त डॉ जे.के. तिटमे, डॉ वर्षाताई शिंदे, संतोष वाकचौरे, डॉ. थोरात दूध संघाचे कार्यकारी संचालक डॉ सुजित खिलारी, संघाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ विजय कवडे, डॉ. प्रमोद पावसे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ तुंबारे म्हणाले की, लंबी हा साथीचा आजार आहे डास, गोचीड, माशा, चिलटे यांपासून या आजाराचा प्रसार होत आहे. जनावरांना ताप येणे, अंगावर गाठी उठणे, नाका डोळ्यातून पाणी वाहने असे काही लक्षणे आढळली तर तातडीने शासकीय अधिकाऱ्यांची संपर्क साधा. या आजाराचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर स्वच्छता ही अत्यंत महत्त्वाची आहे. त्याचबरोबर लम्पी या आजाराचा प्रसार वाढू नये याकरता तालुक्यातील सर्व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपले मूलभूत कर्तव्य म्हणून सर्व शेतकऱ्यांमध्ये जास्तीत जास्त जाणीव जागृती करावी असे आवाहन त्यांनी केले.

  तर रणजितसिंह देशमुख म्हणाले, की आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील 170 गावांमध्ये नागरिकांकडे मोठ्या प्रमाणात पशुधन आहे .तालुक्यातील अगदी मोजक्या काही गावांमध्ये लम्पीआजाराचे लक्षणे आढळलेले पशुधन आहे. लंम्पी आजाराचा धोका ओळखून सर्व शेतकऱ्यांनी अधिक दक्षता घेणे गरजेचे असून आपले गोठे स्वच्छ करून त्या परिसरात जंतुनाशक औषधांची फवारणी करून घ्यावी. तालुक्यातील सर्व पशुवैद्यकीय डॉक्टर्स यांनी शासनाच्या धोरणानुसार आवश्यकतेनुसार पशूंचे लसीकरण करावे .  तसेच शासनाच्या ज्या काही सूचना वेळोवेळी त्याचे तंतोतंत पालन करावे . या आजाराबाबत काही अडचणी असल्यास त्वरित शासकीय पशुवैद्यकीय विभाग व दूध संघाच्या पशुवैद्यकीय विभागातील संपर्क साधावा .या आजाराचा तालुक्यातून समूळ नायनाट करण्यासाठी दूध संघाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असेही ते म्हणाले अधिकारी असे ते म्हणाले.

यावेळी डॉ. तिटमे, डॉ. वाकचौरे, डॉ. प्रमोद पावशे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

COMMENTS