जामखेड : शहरातील राष्ट्रीय महामार्गाचे आधिकारी, भूमिअभिलेख तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी रस्ता हद्द निश्चित करून मार्कींग करून द्यावी त्यानंतर नगरपरि

जामखेड : शहरातील राष्ट्रीय महामार्गाचे आधिकारी, भूमिअभिलेख तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी रस्ता हद्द निश्चित करून मार्कींग करून द्यावी त्यानंतर नगरपरिषद प्रशासनाकडून संबंधित अतिक्रमण काढून जागा मोकळ्या करून द्यावी. ठेकेदाराने लगेच काम चालू करावे अशा सूचना खासदार निलेश लंके यांनी जामखेड शहरातील महामार्गाच्या थांबलेल्या कामाबाबत अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच अधिकाऱ्यांनी वेळेत आपल्या जबाबदाऱ्या पार न पाडल्यास मी स्वतः त्या आधिकारयांच्या दालनात उपोषणाला बसणार आहे असे खासदार यांनी ठणकावून सांगितले.
जामखेड शहरातील महामार्गाच्या लगतचे अतिक्रमण काढून अपूर्ण काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी गेल्या आठदिवसांपासुन सर्व पक्षीय साखळी उपोषण सुरू आहे. दि ६ फेब्रुवारी रोजी जामखेड बेमुदत बंद पुकाराला होता. त्यामुळे खासदार निलेश लंके यांनी आंदोलनस्थळी भेट दिली यावेळी त्यांनी संबधित आधिकारयांशी फोनद्वारे संवाद साधला.
शहरातील रस्त्याच्या कामाला अडथळा ठरणारे अतिक्रमण काढण्यासाठी. दि. २६ मार्च २०२६ पासून अतिक्रमण बाबत अंतिम कार्यवाही होईपर्यंत सर्व पक्षीय जामखेड शहर बेमुदत बंद ठेवण्यात येणार होता मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता सुजित चेमटे यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर जामखेडबंद मागे घेण्यात आला होता.
गेली साडेतीन वर्षांपासून जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. ते अनेक अडथळे व कासव गतीने सुरू आहे. यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते आहे. अडथळा ठरणारे अतिक्रमण काढण्यासाठी विविध पक्षसंघटनांकडून अनेक आंदोलने तर प्रशासकीय पातळीवर अनेक बैठका. तसेच जिल्हाधिकारी यांनी याठिकाणी प्रत्यक्ष भेटू देऊन अतिक्रमण काढण्याच्या सुचना करूनही काहीच होत नसल्याने अखेर जामखेडकरांनी अखेर सर्वपक्षीय साखळी उपोषण करत दि ६ फेब्रुवारी रोजी जामखेड बंद शहर कडकडीत बंद पाळण्यात आला. मात्र शनिवार दि ७ रोजी जामखेडचा आठवडी बाजार आहे. खासदारांसमवेत चर्चा करत आंदोलकांनी जामखेड बंद मागे घेतला मात्र अतिक्रमणे काढून काम चालू होईपर्यंत साखळी उपोषण सुरू ठेवण्यात निर्णय घेण्यात आला. यावेळी खा निलेश लंके, नगराध्यक्ष प्रतिनिधी अमित चिंतामणी, उपोषणकर्ते अवधूत पवार नगरसेवक प्रा विकी घायतडक पवन राळेभात राजेंद्र गोरे, वसीम शेख, प्रशांत राळेभात, विकास राळेभात, माजी सभापती डाॅ.भगवान मुरूमकर, राष्ट्रवादी काँग्रेस नेते शहाजी राळेभात, प्रा लक्ष्मण ढेपे, राहुल उगले, डाँ कैलास हजारे, मयूर भोसले, दत्तात्रय डिसले, अनिल सदाफुले, काकासाहेब कोल्हे, यांच्यासह नागरिक व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS