Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धावत्या ट्रॅव्हल्समध्ये लेडीज स्पेशल ऑपरेशन ; सोन्याची बॅग उडाली, प्रवासी हादरले

नांदेड-   कंधार मार्गावर महिला टोळीचा ‘हातसफाई’ शो! नांदेड । प्रतिनिधीबस थांबते, प्रवासी चढतात आणि दागिने उतरतात! अशी धक्कादायक घटना नांदेड-कं

नांदेडमध्ये विकास, भ्रष्टाचार आणि गुंडगिरीवर रणसंग्राम
अहिल्यानगरमध्ये बोगस मतदानाचा प्रकार उघड; दोन संशयित ताब्यात
ग्रामपंचायत सदस्याच्या कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

नांदेड-   कंधार मार्गावर महिला टोळीचा ‘हातसफाई’ शो!

नांदेड । प्रतिनिधी
बस थांबते, प्रवासी चढतात आणि दागिने उतरतात! अशी धक्कादायक घटना नांदेड-कंधार खाजगी ट्रॅव्हल्समध्ये घडल्याने प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. गर्दीचा फायदा घेऊन, अत्यंत शिताफीने तीन लाख साठ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास करणार्‍या महिला टोळीचा पराक्रम अखेर उघडकीस आला.
जळकोट तालुक्यातील उदगीर येथील अश्विनी मंगनाळे या प्रवास करत होत्या. त्यांच्याबरोबरच्या बॅगेत मौल्यवान सोन्याचे दागिने असल्यामुळे त्या सजग होत्या, पण म्हणतात ना- जिथे गर्दी तिथे चोरीची संधी! त्याच बसमध्ये प्रवासी म्हणून बसलेल्या तीन महिलांनी ही संधी ओळखली. पुष्पा, कमलबाई आणि सुरेखा (रा. नांदेड) या तिघींनी संगनमत करून प्रवासादरम्यानची गडबड, चढ-उतार, कंडक्टरची आरोळी आणि प्रवाशांची धांदल याचा उपयुक्त उपयोग करून हातसफाईचा निपुण प्रयोग केला. इतक्या सफाईदारपणे बॅग लंपास करण्यात आली की, क्षणभर सोनं चालतं का? असा विचारही मनात आला. बस थांबल्यावर आणि प्रवास संपत आला तेव्हा अश्विनी यांना आपली बॅग हलकी वाटू लागली. तपासणी केल्यावर लक्षात आले- सोनं नाही, फक्त आठवणी! क्षणाचाही विलंब न करता अश्विनी यांनी सोनखेड पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी प्रकरण गंभीरतेने घेऊन तिन्ही महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार हंबर्डे या लेडीज गँगच्या तपासणीसाठी नेमले गेले आहेत. बस प्रवासात अशा टोळ्या सक्रिय आहेत का, यावर प्रवासी आणि ट्रॅव्हल्स चालकांमध्ये चर्चा रंगली आहे. प्रवाशांनी आता बॅग, पर्स आणि दागिन्यांकडे अधिक लक्ष ठेवण्याचा निर्धार केला आहे. नांदेड-कंधार मार्गावर आता एकच संदेश फिरतोय- सीट बेल्ट नाही, पण बॅग बेल्ट मात्र घट्ट बांधा!

COMMENTS