Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एसटी बस कंडक्टरच्या तिकिटाच्या पेटीची चोरी

अहमदनगर/प्रतिनिधी ः अपघातग्रस्त झालेल्या एसटी बसमधील प्रवासी अन्य बसमध्ये कंडक्टर बसवून देत असताना कोणीतरी चोरट्याने अपघातग्रस्त बसमधील मॅन्युअ

भातकुडगाव फाटा कडकडीत बंद
आदिवासी समाजासाठी प्रत्येक गावात स्मशानभूमी मिळावी
राज्यमंत्री आदिती तटकरे यांचा समाजभूषण, कर्तव्यसंपन्न ‘लेकीचा’ सन्मान सोहळा संपन्न

अहमदनगर/प्रतिनिधी ः अपघातग्रस्त झालेल्या एसटी बसमधील प्रवासी अन्य बसमध्ये कंडक्टर बसवून देत असताना कोणीतरी चोरट्याने अपघातग्रस्त बसमधील मॅन्युअल ट्रे क्रमांक 64 ची निळी पेटी त्यात 21 ब्लॉक दराचे छापील आकडे असलेले 441 तिकीट असलेली 29 हजार 140 रुपयाची पेटी चोरून नेली. ही घटना नगर-औरंगाबाद रोडने जालनाकडे जाणार्‍या एसटी बसमध्ये घोडेगावच्या बस स्टँडजवळ घडली.

याप्रकरणी बस कंडक्टर श्रीनिवास नाथराव रुद्रे (वय 36, राहणार जवाहर कॉलनी, मंठा, जालना) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास पोलिस हवालदार गावडे करीत आहे. दरम्यान, कंडक्टरच्या तिकिटांच्या पेटीची ही चोरी परिसरात चर्चेची झाली आहे. चोरटे आता काय चोरून नेतील, याचा नेम राहिलेला नाही, असे मिश्किल भाष्यही यानिमित्ताने नागरिकांच्या चर्चेत रंगले आहे.

COMMENTS