पाथर्डीतील घुमटवाडी येथे चक्क पाण्याची चोरी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाथर्डीतील घुमटवाडी येथे चक्क पाण्याची चोरी

अहमदनगर/प्रतिनिधी : वाढत्या उन्हाळ्यामुळे अनेक ठिकाणी पाणीटंचाई जाणवत असताना व ग्रामीण भागात पाण्यासाठी महिलांची वणवण सुरू असताना, दुसरीकडे जेथे मुबल

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने अनुदान द्या
राज्यात कोरोना रुग्ण संख्येचा स्फोट; सलग दुसर्‍या दिवशी 41 हजाराच्यावर कोरोना रुग्ण आढळले
शाळेची खोली पडलेली असते, पण गावातील मंदिर मोठे असते : मंत्री थोरात यांची खंत

अहमदनगर/प्रतिनिधी : वाढत्या उन्हाळ्यामुळे अनेक ठिकाणी पाणीटंचाई जाणवत असताना व ग्रामीण भागात पाण्यासाठी महिलांची वणवण सुरू असताना, दुसरीकडे जेथे मुबलक पाणी आहे, तेथे त्याची चक्क चोरी होत आहे. अर्थात हे चोरी केलेले पाणी पिण्यासाठी नव्हे तर शेती फुलवण्यासाठी वापरले जात असल्याने त्याची तक्रार पोलिसात पोहोचली आहे. त्यामुळे ही पाणी चोरी चर्चेची झाली आहे.
पाथर्डी तालुक्यातील घुमटवाडी येथील ग्रामपंचायतीचे पाणी ग्रामपंचायत कर्मचारी यांनी स्वतःच्या फायद्याकरता व स्वतःच्या शेतीसाठी वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी ग्रामसेवक श्यामराव सूर्यभान साळवे (वय 40, राहणार पाथर्डी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिकंदर पठाण (राहणार पटेलवाडी) व पंढरीनाथ फुलसिंग चव्हाण यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कायदा कलम 379 अन्वये चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास पोलिस नाईक म्हस्के करीत आहे. ग्रामपंचायतीचे पाणी या दोघांनी स्वतःच्या शेती विकासासाठी वापरल्याने व आता त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने परिसरात हा चर्चेचा विषय झाला आहे.

COMMENTS