पेट्रोलपंपावर दगडफेक करून 115 लिटर डिझेलची चोरी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पेट्रोलपंपावर दगडफेक करून 115 लिटर डिझेलची चोरी

अहमदनगर/प्रतिनिधी : पांढर्‍या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमधून आलेल्या चौघाजणांनी पंपावरील कर्मचार्‍यांवर दगडफेकही करुन पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या

धनगर आरक्षणप्रश्‍नी राज्यस्तरावर हालचाली सुरु    
स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या विचारधारेवरच वाटचाल सुरु – आमदार मोनिका राजळे
LokNews24 l बेधुंद ट्रक चालकाने आठ जणांना उडवले

अहमदनगर/प्रतिनिधी : पांढर्‍या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमधून आलेल्या चौघाजणांनी पंपावरील कर्मचार्‍यांवर दगडफेकही करुन पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या मालट्रकमधून 115 लिटर डिझेलची चोरी केल्याची घटना नगर-सोलापूर रोडवर वाळूज शिवारात घडली. येथील खंडेलवाल यांच्या भारत पेट्रोलियम कंपनीच्या पेट्रोलपंपावर रविवारी (दि. 29) रात्री एक कापूस भरलेला ट्रक उभा होता. सोमवारी ( दि.30) पहाटेच्या सुमारास एका पांढर्‍या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमधून चौघेजण पंपावर आले. त्यांनी पंपावर उभ्या मालट्रकमधून 11 हजार रुपये किंमतीचे 115 लिटर डिझेल चोरले. ही चोरी करीत असताना आवाज झाल्याने पंपावरील कर्मचारी सार्थक संजय रोहोकले याला जाग आली व तो ट्रककडे जावू लागला. त्यावेळी चोरट्यांनी त्याच्या दिशेने दगडफेक केली. यावेळी रोहोकले याने आरडाओरडा केल्याने ट्रक चालकासह इतर कर्मचारी जागे झाले. त्यामुळे चोरट्यांनी कारमधून पळ काढला. याबाबत सार्थक रोहोकले यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी चार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार धुमाळ करीत आहे.

COMMENTS