Homeताज्या बातम्यादेश

डझनभर साप घेऊन लग्नसमारंभात पोहोचला तरुण

आपल्या आजूबाजूला साप दिसला तरी आपल्याला घाम फुटतो आणि आपण सगळे तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करतो. पण लग्नाच्या कार्यक्रमातच साप घुसला तर? कदाचित ल

सिव्हिल हडको येथील घरफोडीत दागिन्यांची चोरी
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम पुन्हा सुरु करणार
मानहानी प्रकरणी राहुल गांधींना दिलासा

आपल्या आजूबाजूला साप दिसला तरी आपल्याला घाम फुटतो आणि आपण सगळे तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करतो. पण लग्नाच्या कार्यक्रमातच साप घुसला तर? कदाचित लग्नाला आलेले पाहुणे तिथून पळून जातील आणि एकच गोंधळ उडेल. मात्र आता एका लग्नात धक्कादायक दृश्य पाहायला मिळालं. लग्नात नवरी आणि नवरदेवाला सोडून लोक या व्यक्तीकडेच बघत बसले ज्याने डझनभर साप आपल्यासोबत आणले होते. सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. व्हिडिओमध्ये दिसतं की लग्नाच्या स्टेजवरच एक व्यक्ती आपल्या बॅगेतून अनेक साप बाहेर काढतो. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लग्नाच्या स्टेजवर वधू-वराची नावं लिहिलेली दिसत आहेत. मात्र, वधू-वर स्टेजवर उपस्थित नव्हते, तर तिथे इतर अनेक लोक उभे होते. एक व्यक्ती अचानक मोठ्या उत्साहात स्टेजवर येतो आणि त्याच्या पिशवीतून बरेच साप बाहेर काढतो. यानंतर सापांना आपल्या दोन्ही हातात घेऊन पाहुण्यांना ते दाखवतो. साप पाहून समोर उपस्थित पाहुणेही घाबरले. मात्र, त्या तरुणाने लगेचच ते साप परत बॅगेत ठेवले. काही वेळातच हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला. व्हिडिओ पाहिल्यावर समजतं की हा दक्षिण भारतातील कुठल्यातरी ठिकाणचा आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत. अनेकांनी या पोस्टवर निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत. काहींनी या स्टंटला धाडसी म्हणून व्यक्तीचं कौतुक केले, तर अनेकांनी चिंता व्यक्त केली आणि त्याला मूर्ख म्हटलं. एका युजरने आपल्या कमेंटमध्ये लिहिलं की, “हे खूप भीतीदायक आहे. समोर बसलेल्या पाहुण्यांकडे एक सापही गेला असता तर काय झालं असतं. ” दुसऱ्या वापरकर्त्याने विनंती केली की “कृपया हे पुन्हा करू नका,”. तिसऱ्या वापरकर्त्याने म्हटलं “हे मूर्खपणाचं आहे; कृपया हे परत करू नका. यामुळे इतर लोकांना त्रास होऊ शकतो.”

COMMENTS