Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जलजीवन मिशन योजने अंतर्गत कामाची चौकशी करावी

दोषींवरील कारवाईसाठी साहेबराव रासकर यांचे जि.प.समोर उपोषण

श्रीगोंदा शहर प्रतिनिधी : जलजीवन मिशन योजने अंतर्गत कोकणगाव ग्रामपंचायतचे विहीर, पाण्याची टाकी, आणि पाईपलाईन विस्तारणीकरणासाठी जवळपास 1 कोटी आसपा

अपहरण केलेल्या महिलेवर सलग पाच दिवस अत्याचार
श्री स्वामी समर्थ महाराज चरित्र | Shri Swami Samarth Maharaj | LokNews24 |
डॉ. आंबेडकर जयंती मिरवणुकीतील तणावप्रकरणी सात गुन्हे दाखल

श्रीगोंदा शहर प्रतिनिधी : जलजीवन मिशन योजने अंतर्गत कोकणगाव ग्रामपंचायतचे विहीर, पाण्याची टाकी, आणि पाईपलाईन विस्तारणीकरणासाठी जवळपास 1 कोटी आसपास निधी मंजूर झालेला, असुन विहीर अजून कसलेही काम झालेले नाही. आणि टाकीचे सुध्दा काम चालू झालेले नाही. परंतु लाखोरुपायांचे पाईपलाईन विस्तारणीकरणाचे काम झालेले आहे. त्या पाईपलाईनमध्ये इस्टीमेंटप्रमाणे कोठेच 3 फुट खोली गेलेली नसून, सदील काम रात्रीच्या वेळी करण्यात आलेले आहे. काही  माळरान जमीन असल्यामुळे या ठिकाणी ब्रेकर लावून पाईप लाईन करणे गरजेचे होते परंतु ठेकेदार यांनी वेळ काढू पणा करून कोकणगाव जनतेची लाखो रुपयांची फसवणूक केलेली असल्याचा आरोप साहेबराव रासकर यांनी केला असून, चौकशी आणि दोषीवरील कारवाईसाठी रासकर यांनी जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
ठेकेदार हे एकाही वेळेस कामाच्या ठिकाणी चौकशी करण्यासाठी अथवा भेट देण्यास आलेले नाहीत. त्याचबरोबर कोणत्याही ठिकाणी पाईपलाईन साठी बेड केलेले नाही. ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता गणेश भोसले आणि ठेकेदार यांच्या संगणमताने हे भ्रष्ट काम झालेले आहे.त्यांना वेळोवेळी कॉल करून या बदल माहिती दिली तरी त्यांनी ठेकेदार यांना पाठीशी घालण्याचे काम करत आहेत. अधिकारी गणेश भोसले, ठेकेदार यांचे वरती प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी व झालेले काम यावर चौकशी कमिटी नेमावी यासाठी रासकर हे प्राणांतिक उपोषण साठी जिल्हा परिषद येथे उपोषणास बसले आहेत. ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता गणेश भोसले यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. यापूर्वी त्यांनी 19 मार्च 2024 रोजी मुख्यकार्यकारी आधिकरी जिल्हा परिषद अहमदनगर यांना निवेदन दिले असून यावर कोणतीही कार्यवाही केली गेलेली नाही त्यामुळे साहेबराव रासकर यांनी मंगळवार 2 एप्रिलपासून उपोषण चालु केले आहे.

COMMENTS