Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जामखेड शहरातील मलनिस्सारण प्रकल्पाचे काम निकृष्ट

 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष रस्त्यावर उतरणार; तहसीलदारांना निवेदन  जामखेड : शहरात सध्या नगरपरिषद हद्दीतील मलनिस्सारण प्रकल्प (टप्पा-१) अंतर्गत सुरू असलेली गटार व संबंधित सिव्हिल कामे ही अत्यंत निकृष्ट दर्जाची, शासनमान्य अंदाजपत्रक व तांत्रिक निकषांचे सर्रास उल्लंघन करणारी व अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आाहे. सदर कामांमुळे जामखेड शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून, नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मंगळवारी (दि ३) सकाळी तहसीलदार मच्छिंद्र पाडळे यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की गटार व चेंबरची साईज सिमेंट काँक्रीट करताना मंजूर अंदाज पत्रकातील मापदंड व तांत्रकनिकष पाळले जात नाहीत. तसेच कमी दर्जाचे साहित्य वापरून चेंबर बांधले जात आहेत. गटारसाठी पाईप टाकताना जूने सिमेंट रस्ते जेसीबी मशीनने बेदरकारपणे फोडले जात आहेत, यामुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शासनाच्या मालमत्तेची जाणीवपूर्वक नासधूस करण्यात येत आहे. याबाबत वेळोवेळी तोंडी व लेखी तक्रारी करूनाही संबंधित ठेकेदार, अभियंते व जबाबदार अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कार्यवाही करावी, निकृष्ट काम तात्काळ थाबवून नवीन मोजमाप व दर्जेदार पद्धतीने काम सुरू करण्याचे आदेश देण्यात यावेत, शहरातील खोदलेले रस्ते तात्काळ दरुस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा अन्यथा, प्रशासनाकडून ७ दिवसांच्या आत ठोस व समाधान कारक कार्यवाही न झाल्यास, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट व जामखेड शहरातील समस्त नागरिकांच्या वतीने जामखेड तहसील कार्यालय समोर बेमुदत उपोषण व तीव्र लोकशाही आंदोलन सरू करण्यात येईल असे देखील तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहाजी (काका) राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र पवार, वसीम सय्यद, राजु गोरे, कुंडल राळेभात, माजिद कुरैशी, हरीभाऊ आजबे, अवधुत पवार, इस्माईल सय्यद, निखील घायतड‌क, अमोल गिरमे, सागर सदाफुले, प्रशांत राळेभात, प्रविण उगले, संदीप गायकवाड, अशोक घुमरे, अनिल अडाले, सचिन शिंदे, डॉ. प्रणव राळेभात, प्रविण माकुडे, सागर भोसले, बिलाल शेख, अमर चाऊस, दत्ता डिसले, इम्रान तांबोळी, नासीर सय्यद सह अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येंने उपस्थित होते. अतिक्रमण हटल्याशिवाय विकास नाही : राळेभात  जामखेड शहरातील राष्ट्रीय महामार्गाचे काम देखील रखडले आहे. गटार, पाणीपुरवठा, रस्ते सगळी विकासकामे अतिक्रमणामुळे रखडली आहेत. काहींच्या बेकायदेशीर अडथळ्यामुळे संपूर्ण जामखेडकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याप्रश्नी तात्काळ कारवाई करून शहराच्या विकासासाठी रस्ते त्वरित मोकळे करावेत, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शहाजी राळेभात यांनी दिला.

विकासासाठी सदैव नगराध्यक्षांना साथ : टायरवाले 
प्रा.डॉ.के.एच.शिंदे ‘रयत’च्या जनरल बॉडीवर
प्रशासनाविरुद्ध सर्वपक्षीय एकवटले; आज जामखेड बंद 

 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष रस्त्यावर उतरणार; तहसीलदारांना निवेदन 

जामखेड : शहरात सध्या नगरपरिषद हद्दीतील मलनिस्सारण प्रकल्प (टप्पा-१) अंतर्गत सुरू असलेली गटार व संबंधित सिव्हिल कामे ही अत्यंत निकृष्ट दर्जाची, शासनमान्य अंदाजपत्रक व तांत्रिक निकषांचे सर्रास उल्लंघन करणारी व अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आाहे. सदर कामांमुळे जामखेड शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून, नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मंगळवारी (दि ३) सकाळी तहसीलदार मच्छिंद्र पाडळे यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की गटार व चेंबरची साईज सिमेंट काँक्रीट करताना मंजूर अंदाज पत्रकातील मापदंड व तांत्रकनिकष पाळले जात नाहीत. तसेच कमी दर्जाचे साहित्य वापरून चेंबर बांधले जात आहेत. गटारसाठी पाईप टाकताना जूने सिमेंट रस्ते जेसीबी मशीनने बेदरकारपणे फोडले जात आहेत, यामुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शासनाच्या मालमत्तेची जाणीवपूर्वक नासधूस करण्यात येत आहे. याबाबत वेळोवेळी तोंडी व लेखी तक्रारी करूनाही संबंधित ठेकेदार, अभियंते व जबाबदार अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कार्यवाही करावी, निकृष्ट काम तात्काळ थाबवून नवीन मोजमाप व दर्जेदार पद्धतीने काम सुरू करण्याचे आदेश देण्यात यावेत, शहरातील खोदलेले रस्ते तात्काळ दरुस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा अन्यथा, प्रशासनाकडून ७ दिवसांच्या आत ठोस व समाधान कारक कार्यवाही न झाल्यास, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट व जामखेड शहरातील समस्त नागरिकांच्या वतीने जामखेड तहसील कार्यालय समोर बेमुदत उपोषण व तीव्र लोकशाही आंदोलन सरू करण्यात येईल असे देखील तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहाजी (काका) राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र पवार, वसीम सय्यद, राजु गोरे, कुंडल राळेभात, माजिद कुरैशी, हरीभाऊ आजबे, अवधुत पवार, इस्माईल सय्यद, निखील घायतड‌क, अमोल गिरमे, सागर सदाफुले, प्रशांत राळेभात, प्रविण उगले, संदीप गायकवाड, अशोक घुमरे, अनिल अडाले, सचिन शिंदे, डॉ. प्रणव राळेभात, प्रविण माकुडे, सागर भोसले, बिलाल शेख, अमर चाऊस, दत्ता डिसले, इम्रान तांबोळी, नासीर सय्यद सह अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येंने उपस्थित होते.

अतिक्रमण हटल्याशिवाय विकास नाही : राळेभात

 जामखेड शहरातील राष्ट्रीय महामार्गाचे काम देखील रखडले आहे. गटार, पाणीपुरवठा, रस्ते सगळी विकासकामे अतिक्रमणामुळे रखडली आहेत. काहींच्या बेकायदेशीर अडथळ्यामुळे संपूर्ण जामखेडकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याप्रश्नी तात्काळ कारवाई करून शहराच्या विकासासाठी रस्ते त्वरित मोकळे करावेत, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शहाजी राळेभात यांनी दिला.

COMMENTS