कुडाळ / वार्ताहर : जावली-महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रवास हा प्रगतीच्या दिशेने सुरु असून मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध

कुडाळ / वार्ताहर : जावली-महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रवास हा प्रगतीच्या दिशेने सुरु असून मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून व्यापारी संकुलाचे काम मार्गी लागले आहे. राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या सहकार्याने या बहुद्देशीय व्यापारी संकुलाकरीता निधी उपलब्ध झाल्याने या व्यापारी संकुलाचे काम लवकरच पूर्ण होईल. नुकताच जावली महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचा ड वर्ग बाजार समितीतून क वर्ग बाजार समितीमध्ये समावेश झाला आहे. शेतकरी व्यापारी यांना निश्चितच लाभ होणार आहे, असे प्रतिपादन सभापती जयदीप शिंदे यांनी केले.
कुडाळ (ता. जावली) येथील जावली महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील सार्वजनिक बांधकाम ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले बहुउद्देशीय व्यापारी संकुल व शेतकरी भवनाचा भूमिपूजन समारंभप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी जावली तालुक्याचे माजी आमदार सदाशिव सपकाळ, सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे, जिल्हा बँकचे संचालक ज्ञानदेव रांजणे, राजेंद्रशेठ राजपुरे, प्रतापगड कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, जावली महाबळेश्वर बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, उपसभापती हेमंत शिंदे, जावळी पंचायत समितीचे माजी उपसभापती हणमंत पार्टे, भारतीय जनता पार्टीचे जावली अध्यक्ष संदीप परामणे, मारुती चिकणे, प्रतापगड कारखान्याचे व्हाईस चेअरमन शिवाजीराव मर्ढेकर, माजी संचालक मालोजीराव शिंदे, उद्योजक दत्ताशेठ भालेघरे, माजी उपसभापती रवी परामणे, सागर धनावडे, संचालक मच्छिद्र मुळीक, राजेंद्र भिलारे, मनेश फरांदे, बुवासाहेब पिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना जावली तालुक्याचे माजी आमदार सदाशिव सपकाळ, सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी संचालक मंडळाच्या कामकाजाचे कौतुक केले. बाजार समितीचे सचिव महेश देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. मच्छिंद्र मुळीक यांनी स्वागत केले. बुवासाहेब पिसाळ यांनी आभार मानले.

COMMENTS