Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निसर्ग व पर्यावरण मंडळाचे कार्य आदर्शवत : डॉ.दुधाट

श्रीरामपूर : उष्णता, हवा, पाणी यांचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन काळाची गरज असून विद्यार्थ्यांनी ह्या कार्याची सुरुवात आपल्यापा

श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धांचा समारोप
अहमदनगर जिल्ह्यातील आठवडे बाजार २९ मार्चपासून १५ एप्रिलपर्यंत राहणार बंद : जिल्हाधिकारी
विरोधकांना हार दिसत असल्यामुळेच हल्ला ः उत्कर्षा रूपवते

श्रीरामपूर : उष्णता, हवा, पाणी यांचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन काळाची गरज असून विद्यार्थ्यांनी ह्या कार्याची सुरुवात आपल्यापासून करावी. या कार्यप्रती निसर्ग व पर्यावरण मंडळाचे वृक्षसंवर्धनाचे कार्य आदर्शवत आहे, असे प्रतिपादन डॉ. शरद दुधाट यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील डी. के. मोरे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे निसर्ग व सामाजिक प्रदूषण मंडळाचे अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष व नवनियुक्त पदाधिकारी बाळासाहेब कडू यांची मंडळावर नियुक्ती झाल्याबद्दल सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य साहेबराव कोल्हे हे होते. याप्रसंगी नवनियुक्त पदाधिकारी बाळासाहेब कडू यांचा मंडळाचे राज्यसंघटक डॉ. दुधाट यांच्या हस्ते वृक्ष भेट देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत आणि आभार पोपट दये यांनी केले. याप्रसंगी जिल्हा संघटक राधाकिसन दिघे, रवींद्र पठारे, अरुण कुळसुंदर, उपप्राचार्य प्रतापराव आहेर, पर्यवेक्षिका श्रीमती रणशुर यांच्या शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा कार्यकारणी सदस्य अर्जुन राऊत यांनी आपल्या मनोगतातून पर्यावरण प्रदूषणाचे महत्त्व विशद केले. यावेळी डॉ. दुधाट यांनी आपल्या मनोगतात सांगितले की वृक्षमित्र स्व.आबासाहेब मोरे यांच्या कार्याचा वारसा त्यांचे पुतणे मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे हे यशस्वीरित्या सांभाळत असून पर्यावरण समतोलासाठी हे मंडळ महाराष्ट्रभर अविरतपणे कार्यरत आहेत. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संगमनेर परिसरात पर्यावरण वाचविण्याचा आदर्शवत उपक्रम सुरू असून या उपक्रमातून लाखो रोपांचे रोपण आणि संवर्धन होत आहे. शेवटी  बाळासाहेब कडू यांनी उपस्थितांचे आभार मानले.

COMMENTS