Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

क्रांतिज्योती सावित्रीबाईंचे कार्य आजही प्रेरणादायी : पोटे

श्रीगोंदा : समाजातील स्त्री-रुष विषमतेची दरी आजही कमी झालेली नाही. ती कमी करण्यासाठी सावित्रीबाईंनी केलेले कार्य आजही समाजाला प्रेरणादायी ठरत आहे असे प्रतिपादन सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त लोखंडेवाडी जिल्हा परिषद शाळेत आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानाहून बोलताना ऍड.यशवंत पोटे यांनी केले.  यावेळी नूतन नगरसेवक राजेंद्र खेडकर, ऋषिकेश बोरुडे, पल्लवी पोटे व कोमल बोरुडे यांचा शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. ग्रामस्थ संतोष लोखंडे यांनी यावेळी मनोगत व्यक्त करत शाळेच्या वर्गखोलीचा प्रश्नासह पिण्याचे पाणी व इतर समस्या मांडल्या. नगरसेवक राजेंद्र खेडेकर, पल्लवी पोटे, कोमल बोरुडे, ऋषिकेश बोरुडे तसेच पांडुरंग पोटे यांनी नगरपालिके कडून शक्य तेवढे सर्वतोपरी सहकार्य करण्याचे तसेच इतरही समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. राजेंद्र खेडकर यांनी शाळेची गरज ओळखून सुमारे आठ हजार रुपये किमतीचे एक ऑफिस कपाट तातडीने देण्याचे जाहीर केले.     कार्यक्रमास दत्तात्रय सुद्रिक, सोमनाथ शिर्के, सुदाम घोरपडे, कैलास लोखंडे, अण्णासाहेब पोटे, बाळासाहेब लोखंडे, संतोष मोटे, परशुराम शिर्के, सोमनाथ लोखंडे, बाळासाहेब मोटे, विलास लोखंडे, दादासाहेब कुसकर, जयसिंग सुद्रिक सहशिक्षिका मंगल जाचक आदींसह पालक व महिला भगिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक डॉ.संदीप मोटे यांनी केले तर आभार संतोष लोखंडे यांनी मानले. बाबासाहेब किसन लोखंडे यांनी यावेळी स्वतःची तीन गुंठे जागा शाळेस बक्षीसपत्र करून देण्याचे जाहीर केल्याने अनेक वर्षापासूनचा शाळेच्या जागेचा प्रश्न सुटणार आहे. याबद्दल ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने बाबासाहेब लोखंडे यांचे ऋण व्यक्त करत सत्कार केला.

भागुजीराव ढेकळे विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन म्हणून साजरा
महात्मा गांधी विद्यालयात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
माऊली विद्यालय जवळबन येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

श्रीगोंदा : समाजातील स्त्री-रुष विषमतेची दरी आजही कमी झालेली नाही. ती कमी करण्यासाठी सावित्रीबाईंनी केलेले कार्य आजही समाजाला प्रेरणादायी ठरत आहे असे प्रतिपादन सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त लोखंडेवाडी जिल्हा परिषद शाळेत आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानाहून बोलताना ऍड.यशवंत पोटे यांनी केले.

 यावेळी नूतन नगरसेवक राजेंद्र खेडकर, ऋषिकेश बोरुडे, पल्लवी पोटे व कोमल बोरुडे यांचा शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. ग्रामस्थ संतोष लोखंडे यांनी यावेळी मनोगत व्यक्त करत शाळेच्या वर्गखोलीचा प्रश्नासह पिण्याचे पाणी व इतर समस्या मांडल्या. नगरसेवक राजेंद्र खेडेकर, पल्लवी पोटे, कोमल बोरुडे, ऋषिकेश बोरुडे तसेच पांडुरंग पोटे यांनी नगरपालिके कडून शक्य तेवढे सर्वतोपरी सहकार्य करण्याचे तसेच इतरही समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. राजेंद्र खेडकर यांनी शाळेची गरज ओळखून सुमारे आठ हजार रुपये किमतीचे एक ऑफिस कपाट तातडीने देण्याचे जाहीर केले.    

कार्यक्रमास दत्तात्रय सुद्रिक, सोमनाथ शिर्के, सुदाम घोरपडे, कैलास लोखंडे, अण्णासाहेब पोटे, बाळासाहेब लोखंडे, संतोष मोटे, परशुराम शिर्के, सोमनाथ लोखंडे, बाळासाहेब मोटे, विलास लोखंडे, दादासाहेब कुसकर, जयसिंग सुद्रिक सहशिक्षिका मंगल जाचक आदींसह पालक व महिला भगिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक डॉ.संदीप मोटे यांनी केले तर आभार संतोष लोखंडे यांनी मानले.

बाबासाहेब किसन लोखंडे यांनी यावेळी स्वतःची तीन गुंठे जागा शाळेस बक्षीसपत्र करून देण्याचे जाहीर केल्याने अनेक वर्षापासूनचा शाळेच्या जागेचा प्रश्न सुटणार आहे. याबद्दल ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने बाबासाहेब लोखंडे यांचे ऋण व्यक्त करत सत्कार केला.

COMMENTS