Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सदृढ समाजनिर्मितीचे कार्य रोटरीच्या माध्यमातून व्हावे -डॉ.सुरेश साबु

पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने रोटरी भूषण पुरस्काराने सन्मानित

अंबाजोगाई प्रतिनिधी - समाजात शांतता व समन्वय प्रस्थापित करण्याचे काम रोटरी क्लब करते.  अंबाजोगाईतही सदृढ समाज निर्मितीचे कार्य रोटरीच्या माध्यमा

सुषमा अंधारे आमदार शिरसाटांवर ठोकणार तीन रूपयांचा दावा
‘नीट’चा घोळ
लखनऊमध्ये भिंत कोसळून 9 मजुरांचा मृत्यू

अंबाजोगाई प्रतिनिधी – समाजात शांतता व समन्वय प्रस्थापित करण्याचे काम रोटरी क्लब करते.  अंबाजोगाईतही सदृढ समाज निर्मितीचे कार्य रोटरीच्या माध्यमातून व्हावे, अशी अपेक्षा रोटरीचे प्रांतपाल सुरेश साबु यांनी व्यक्त केली. तर यावेळी  पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने  यांना रोटरी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीचा पदग्रहण समारंभ व रोटरीभूषण पुरस्कार वितरण समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून सुरेश साबु  बोलत होते. यावेळी व्यासपिठावर रोटरीचे उपप्रांतपाल गणेश वाघ ,  सत्कारमूर्ती पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने,रोटरीचे मावळते अध्यक्ष मोईन शेख, सचिव भीमाशंकर शिंदे, नवनिर्वाचित अध्यक्ष स्वप्नील परदेशी, सचिव गणेश राऊत उपस्थित होते. यावेळी बोलतांना साबु म्हणाले की, समाजातील सर्व घटकांना एकत्रित करण्याचे काम रोटरीच्या माध्यमातून होते. उपेक्षितांना न्याय देण्यासाठी व समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जाणे हा उपक्रम राबविण्यात यावा. तसेच सामाजिक स्वास्थ्य टिकवून परस्परांचे संबंध वृद्धींगत करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी गणेश वाघ,  नवनिर्वाचित अध्यक्ष स्वप्नील परदेशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोटरी भूषण पुरस्काराचे वितरण डॉ. तात्याराव लहाने यांना शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आले. रोटरीचे मावळते अध्यक्ष मोईन शेख  यांनी नूतन अध्यक्ष स्वप्नील परदेशी यांच्याकडे पदभार सोपवला. तर सचिव भीमाशंकर शिंदे  यांनी आपल्या पदाचा कार्यभार नवनिर्वाचित सचिव गणेश राऊत यांच्याकडे सोपविला. यावेळी रोटरी क्लबच्या वतीने काढण्यात आलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तर विशेष कार्याबद्दल डॉ. नवनाथ घुगे, प्रा.रमेश सोनवळकर, सुभाष शेप ,अंगद कराड, ज्योती शिंदे यांचे स्वागत करण्यात आले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. गणेश स्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अहवाल वाचन मोईन शेख यांनी केले. संचालन ज्योती शिंदे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार गणेश राऊत यांनी मानले.  या कार्यक्रमास महिला व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
रघुनाथ नेत्रालय व रोटरीच्या माध्यमातून सेवा देणार – डॉ.लहाने
रघुनाथ नेत्रालय व रोटरीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरजू नेत्र रुग्णांना अत्याधुनिक सेवा देण्यासाठी येत्या ऑगस्ट महिन्यापासून सुरुवात करणार असल्याचे पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने  यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना सांगितले. आपल्याला रोटरी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्या बद्दल त्यांनी रोटरीचे आभार मानले. समाजात निष्ठेने काम करताना अनेक अडचणी येतात.मात्र त्यावर मात करून काम करण्याचा सल्ला डॉ.लहाने यांनी दिला.मोबाईल चा वापर फक्त कामापुरता करा.मनोरंजनाचे साधन म्हणून सतत वापर केल्यास त्याचे मोठे दुषपरिणाम भोगावे लागतील.असा मौलिक सल्ला ही त्यांनी दिला.

COMMENTS