Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माणुसकीच्या मंदिरातून जोपासले जाणारे कार्य हृदयस्पर्शी !

महेश सावंत : वारीतील मोफत मदत सेवा केंद्राला सदिच्छा भेट

कोपरगाव : समाजातील वंचित, गरजूंसाठी जे कामकाज केले जात आहे. माणुसकी जपत, माणुसकीच्या भिंतींनी उभारलेल्या या माणुसकीच्या मंदिरातून माणवतेचा जो धर्

संजीवनीच्या सहा अभियंत्यांची सॅनी कंपनीत नोकरीसाठी निवड
शेतकऱ्यावर गोळीबार करणारा आरोपी कर्जत पोलिसांकडून उस्मानाबादमधून जेरबंद
कोरडगावची अवलिया बाबा यात्रा उत्साहात

कोपरगाव : समाजातील वंचित, गरजूंसाठी जे कामकाज केले जात आहे. माणुसकी जपत, माणुसकीच्या भिंतींनी उभारलेल्या या माणुसकीच्या मंदिरातून माणवतेचा जो धर्म जोपासला जात आहे. हे कार्य सर्वोत्तम आहे. आणि या कार्यातून गरजवंतांना होणारी मदत आणि त्यातून त्यांच्या चेहर्‍यावर दिसणारा आनंद हा हृदयस्पर्शी असल्याचे गौरवद्गार कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांनी काढले.
   कोपरगाव तालुक्यातील वारी येथील राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित मोफत मदत सेवा केंद्रास कोपरगाव चे तहसीलदार महेश सावंत यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीकृष्ण पाठक उपस्थित होते. यावेळी गट विकासासाठी अधिकारी पाठक म्हणाले गावासह परिसरातील नागरिकांसाठी ट्रस्ट मार्फत केली जाणारी मदत ही अतुलनीय आहे. तसेच मोफत मदत सेवा केंद्र मार्फत शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मोफत कागदपत्रांची जुळवाजुळ करून प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करण्याचे दातृत्वरुपी कार्य हे कौतुकास्पद आहे. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य तथा पत्रकार रोहित टेके, कोपरगाव तहसीलचे लिपिक रामदास माळवदे, कामगार तलाठी प्रसाद कदम, संदीप लहाने, तलाठी ठेंगडे, कोतवाल संदीप गायकवाड, मदत केंद्रातील स्वयंसेवक गणेश भाटी, संजय कवाडे व रविंद्र टेके, वाल्मिकराव साळे, आणा वायडे, सुंदर पगारे, शंकर धामणे, माधव पंडोरे उपस्थित होते.

COMMENTS