Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बुलेटवर बसलेल्या महिलेचा ओढणीने घेतला जीव

वसई प्रतिनिधी - दुचाकीवरुन प्रवास करताना विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. थोडीशी जरी चूक झाली तरी मोठा अनर्थ घडतो. वसई येथे अशीच एक दुदैवी घटना घड

लग्नकार्यास निघालेल्या वऱ्हाडाच्या बसला अपघात, ७ ठार अनेक जखमी
मालवाहतूक वाहनाने धडक दिल्याने दोन दुचाकीस्वार जखमी.
रिक्षा आणि बाईक चा अपघात.

वसई प्रतिनिधी – दुचाकीवरुन प्रवास करताना विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. थोडीशी जरी चूक झाली तरी मोठा अनर्थ घडतो. वसई येथे अशीच एक दुदैवी घटना घडली आहे. पती-पत्नी देवदर्शनाहून घरी निघाले असताना चाकात ओढणी अडकून पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पत्नीच्या निधनामुळे पतीवर दु:खाचा मोठा डोंगर कोसळलाय. याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईहून पती-पत्नी आपल्या मनातली इच्छा घेऊन तुंगारेश्वार येथील महादेवाच्या दर्शनासाठी आले होते. महादेव चरणी त्यांनी मस्तक टेकवलं आणि मनातली इच्छाही सांगितली. देवदर्शन झाल्यावर दोघेही पून्हा घराच्या दिशेने निघाले. पती आणि पत्नी दोघेही बुलेटवरुन घरी जात होते. यावेळी पत्नीची ओढणी दुचाकीच्या मागच्या चाकात अडकली. ओढणी चाकात अडकल्याने पत्नीला गळफास बसला आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात पत्नीच्या डोक्याचा जोरात मार लागला. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.

COMMENTS