Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अकोलेत डिझेलअभावी एसटीचे चाके थांबली

ढिसाळ नियोजनामुळे प्रवाशांसह विद्यार्थ्यांना मनस्ताप

अकोले ः अकोले एसटीच्या कारभाराच्या ढिसाळ नियोजनामुळे पितळ उघडे पडले. यामुळे अनेकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. अकोले तालुका आदिवासी तालुका

राहत्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन
एस.एस.जी.एम. महाविद्यालयात गांधी विचार संस्कार परीक्षा उत्साहात
एनडीएच्या शपथविधीसाठी अकोल्यातून राहुल देशमुख यांची उपस्थिती

अकोले ः अकोले एसटीच्या कारभाराच्या ढिसाळ नियोजनामुळे पितळ उघडे पडले. यामुळे अनेकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. अकोले तालुका आदिवासी तालुका ओळखला जातो. जिल्ह्यात सर्वांना दळणवळणाचा डोंगराळ व सर्वदूर असा परिसर आहे. अकोले एसटी डेपोवर येथील सर्वांचे प्रवासी जीवन अवलंबून आहे. अकोले डेपोत आज एसटी बसला डिझेल नसल्याने प्रवाशांचे चांगलीच तारांबळ उडाली. कोतुळ, समशेरपूर, राजूर, घाटगर या बाजारपेठांच्या गावापर्यंत व शाळा, विद्यालयातून विद्यार्थ्यांना गावाकडे व घरी आल्यावर पोहचणे अवघड झाले
ग्राहक पंचायतचे मच्छिंद्र मंडलिक, दत्ता शेनकर, रमेश राक्षे, महेश नवले, भाऊसाहेब वाकचौरे, यांनी या बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली . उद्याही डिझेल चा पुरवठा होईल की नाही ही शंका असल्याने प्रवाशांसाठी पर्यायी उपाययोजना करून अकोले एस टी डेपोच्या 35-40 बस उभ्या असून त्यांना डिझेल पुरवठा करण्यात यावा. विद्यार्थ्यांची व प्रवाशांची होणारे नुसकान व डेपोतील चालक, वाहक असे 200-250 तात्कळत उभे राहतील याचा भार सामान्य जनतेवर पडणार आहे. अकोले डेपोला सक्षम नियंत्रक नसल्यामुळे प्रवाशांचे व जनतेचे गैरसोय होत आहे. याकडे मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी अकोले ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

COMMENTS