इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात बोलणार नेतृत्व कोणतं आणि कामाच नेतृत्व कोणतं, हे लोकांना समजल्याने या निवडणुकीत लोकांनीच पर

इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात बोलणार नेतृत्व कोणतं आणि कामाच नेतृत्व कोणतं, हे लोकांना समजल्याने या निवडणुकीत लोकांनीच परिवर्तनाची लाट आणली आहे. या परिवर्तनाच्या लाटेत विरोधकांचे अस्तित्व संपलेले दिसेल. या मतदार संघात विकासाच्या नव्या निशिकांतदादा पर्वाला सुरुवात होईल, असे प्रतिपादन सुनीता निशिकांत भोसले-पाटील यांनी केले.
इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांच्या प्रचारार्थ बैठकीत त्या बोलत होत्या. दरम्यान, त्यांनी लवणमाची, बिचुद, बेरडमची, रेठरे हरणाक्ष, दुधारी, ताकारी येथे मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या व संवाद साधला. यावेळी तैसीन आत्तार, सुरेखा जगताप प्रमुख उपस्थित होत्या.
सुनीता भोसले-पाटील म्हणाल्या, निशिकांतदादांना अनेकवेळा संघर्ष करावा लागला. पण ते न डगमगता त्यास धैर्याने सामोरे गेले. त्यांनी कोणताही राजकीय लोभ न बघता लोकांच्या हितासाठी, गोरगरीब लोकांच्या कल्याणासाठी कायम सेवा सुरू ठेवली आहे. या मतदार संघाच्या विकासासाठी ते अहोरात्र काम करत आहेत. आज त्यांना लोकांनी या निवडणूक रिंगणात आणले आहे. लोकांनीच ही निवडणूक हाती घेतली आहे. त्यामुळे या निवडणुकीत निशिकांतदादांचा विजय निश्चित आहे. केंद्र व राज्य सरकारने महिला आर्थिक सबलीकरणाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल उचलले. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना, महिलांना एसटी प्रवास दरामध्ये 50 टक्के सूट तसेच मुलींना मोफत व उच्च शिक्षणासारख्या अनेक कल्याणकारी योजना सुरु केल्या. या योजना कायमस्वरूपी सुरू राहण्यासाठी राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणे आवश्यक आहे. त्यासाठी निशिकांतदादांना या निवडणुकीत बळ द्या व इस्लामपूर विधानसभा मतदार संघात परिवर्तन घडवा.
यावेळी महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
COMMENTS