Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहाता बस स्थानकातील प्रसाधनगृहातील पाणी रस्त्यावर

राहाता ः स्वच्छ व सुंदर बस स्थानक अभियानात नाशिक विभागामध्ये राहाता बसस्थानकाला तिसर्‍या क्रमांकाचे दीड लाख रुपये पारितोषिक मिळाले. अशी स्वच्छता

त्या निकालाचे न्यायालयाने मूल्यमापन करावे; सीबीआय संचालक मुदतवाढ याचिका
गोकुळच्या लुटलेल्या पैशाची महाडिकांना मस्ती: सतेज पाटलांचा हल्ला | सुपरफास्ट महाराष्ट्र | LokNews24
श्रीगोंद्यात वीज नसल्याने संभाजी ब्रिगेड आक्रमक

राहाता ः स्वच्छ व सुंदर बस स्थानक अभियानात नाशिक विभागामध्ये राहाता बसस्थानकाला तिसर्‍या क्रमांकाचे दीड लाख रुपये पारितोषिक मिळाले. अशी स्वच्छता असलेले राहाता बस स्थानक हे आतून एकदम स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी बस स्थानक प्रशासन प्रयत्न करत आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून बस स्थानकातील प्रसाधनगृहाचे सेफ्टी टाकीतील पाणी व मैला हा बस स्थानकाच्या शेजारील असणार्‍या रस्त्यावर हे पाणी येत असल्याने रस्त्यावरून जा-ये करणार्‍या नागरिकांना या घाण दुर्गंधीयुक्त पाण्यातून जावे लागत आहे.
बस स्थानक प्रशासनाने जशी बस स्थानकातील आत मधील स्वच्छता ठेवण्यासाठी लक्ष केंद्रित केले आहे. तसेच बाहेर बाजूच्या कडे लक्ष दिले गेले पाहिजे असे स्थानिकांचे व प्रवाशांचे म्हणणे आहे.सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल होऊन नागरिकांची गैरसोय होते. साचलेल्या पाण्यामुळे चिखल होऊन नागरिकांना कसरत करत मार्ग काढावा लागतो.साचलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने तसेच रोडच्या बाजूला मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात गवत असल्याने या ठिकाणी डासांची उत्पत्ती होऊन रोगराई वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी बस स्थानक प्रशासनाने या सेफ्टी टाकीची लवकरात लवकर दुरुस्ती करून घ्यावी अशी मागणी शहरातील नागरिक करत आहे.

COMMENTS